उदगीर (एल पी उगीले) उदगीर येथील युवा नेत्ररोग तज्ञ व अल्पावधीत उदगीर तालुका आणि सीमा भागात लोकप्रिय झालेले डॉ. सुदाब मंजोबा बिरादार यांच्या बिरादार नेत्र रुग्णालय व फेको सेंटर यांच्या संयुक्त विद्यमानाने रुपेश शोभा विश्वनाथ शिंदे मित्र मंडळ यांच्या सुयोग्य नियोजनातून लिंकन इंटरनॅशनल स्कूल निडीेबन येथे भव्य दिव्य असे नेत्ररोग निदान व अल्प दरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर दिनांक 15 सप्टेंबर रोजी सकाळी 11 ते दुपारी चार वाजेपर्यंत शिबिर आयोजित करण्यात आले आहे. तसेच आशीर्वाद युवा गणेश मंडळ यांच्याही वतीने बिरादार मित्र रुग्णालय व फेको सेंटर यांच्या संयुक्त विद्यमानाने देखील मोफत नेत्र तपासणी व अल्प दरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन दिनांक 15 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 11 ते 2:30 वाजेपर्यंत संपन्न होणार आहे.
या शिबिराचे उद्घाटन करण्यासाठी प्रमुखातिथी म्हणून सामाजिक कार्यकर्ते उमाकांत तपशाळे, माजी सरपंच रणजीत पाटील, युवा नेते योगेश विश्वनाथ शिंदे, बालाजी बिरादार हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या दोन्ही मोफत नेत्र तपासणी शिबिरामध्ये मोतीबिंदू निदान तसेच आवश्यक असलेल्या रुग्णांना अल्प दरामध्ये शस्त्रक्रियेच्या संदर्भामध्ये मार्गदर्शन व शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. या सोबतच ज्या नेत्र रुग्णांना फक्त जवळचेच कमी दिसते, त्यांच्यासाठी जवळचा चष्मा अल्प दरात दिला जाईल. जे रुग्ण मोतीबिंदू शस्त्रक्रिया पात्र असतील त्यांची शस्त्रक्रिया अल्प दरात करण्यात येईल. व शिबिराच्या दुसऱ्या दिवशी त्यांना गावातून हॉस्पिटलच्या गाडीमध्ये उदगीर येथे नेण्यात येईल, व ऑपरेशन नंतर दुसऱ्या दिवशी गावात सोडण्यात येईल. ज्या रुग्णांना मशीनद्वारे अर्थात फेको मशीनच्या मदतीने ऑपरेशन करायचे आहे, त्यांच्यासाठी सर्व प्रकारे फोल्डेबल लेंसची व्यवस्था बिरादार नेत्र रुग्णालय उदगीर येथे उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. गरजू रुग्णांना डोळ्याचे मोफत औषध वाटप केले जाणार आहे. या संदर्भामध्ये अधिक माहितीसाठी यंदा महापुरे 9657671779 व गणेश जोगदंड 8888765313 यांच्याशी संपर्क साधावा. असे संयोजकाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.
या शिबिरामध्ये कॉम्प्युटर द्वारे संपूर्ण नेत्र तपासणी तसेच बिना टाका व बिना इंजेक्शन मोतीबिंदू शस्त्रक्रिया फेको मशीनद्वारे शस्त्रक्रिया, त्यासोबतच डोळ्याच्या कोरडेपणाची तपासणी व उपचार, पापणी वरील गाठीची शस्त्रक्रिया, तिरळेपणाच्या संदर्भामध्ये तपासणी व उपचार करण्यात येणार आहे. काचबिंदू झालेल्या रुग्णांसाठी उपचार व शस्त्रक्रियेचे ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. मधुमेह रुग्णांच्या डोळ्याच्या मागील पडद्याची तपासणी देखील करण्यात येणार आहे. नासूर तपासणी व उपचार सुविधा उपलब्ध आहेत. कॉन्टॅक्ट लेन्सची सुविधा उपलब्ध आहेत. सर्व प्रकारचे फोलडेबल लेन्स उपलब्ध असून त्या संदर्भामध्ये नेत्र रुग्णालयाशी संपर्क साधावा. असे आवाहन करण्यात आले आहे. या शस्त्रक्रिया शिबिरामध्ये डॉ. सुदाम मंजोबा बिरादार हे स्वतः उपस्थित राहून तपासणी व गरज असल्यास शस्त्रक्रिया करणार आहेत. या सोबतच आशीर्वाद युवा गणेश मंडळाच्या वतीने ही मोफत नेत्र तपासणी व आवश्यकता असल्यास अल्प दरात शस्त्रक्रिया शिबिराची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या संदर्भामध्ये गरजूंनी गुरुनाथ पांढरे 9960466008 व गणेश जोगदंड 8888765313 यांच्याशी संपर्क साधावा. असे आवाहन करण्यात आले आहे.
अल्पावधीत लोकप्रिय झालेल्या डॉ. सुदाम बिरादार यांच्या नेत्र रुग्णालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराचा जास्तीत जास्त रुग्णांनी लाभ घ्यावा. असे आवाहन संयोजकाच्या वतीने करण्यात आले आहे.




Responses (0 )