शिवसैनिकांनो ताकतीने कामाला लागा येणारी सत्ता तुमची असेल – पाठक

शिवसैनिकांनो ताकतीने कामाला लागा येणारी सत्ता तुमची असेल - पाठक

शिरूर ताजबंद (गोविंद काळे) : शिव संपर्क अभियाना अंतर्गत शिरूर ताजबंद तालुका अहमदपूर येथे शाखा प्रमुख व बूथ प्रमुख,गट प्रमुख आजी माजी पदाधिकारी व शिवसैनिकांची बैठक आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी जोगेश्वरी ( पुर्व ) विधानसभा क्षेत्र मुंबई चे उपविभाग प्रमुख तथा विशेष कार्यकारी अधिकारी कैलासनाथ पाठक यांनी शिवसैनिकांशी संवाद साधताना बोलत होते शिवसैनिकांनो जोमाने कामाला लागा येणारी सत्ता तुमची असेल,शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार, मार्गदर्शक शिवसेना नेते चंद्रकांत खैरे विकासाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जनतेची कामे करून जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करा.जनतेच्या अडी अडचणी सोडवण्यासाठी प्रत्येक नागरिकाला शिवसैनिक हा धाऊन गेला पाहिजेत,शासकीय कार्यालयात ज्येष्ठ नागरिक ,शेतकरी कष्टकरी कामगार बांधवांच्या हितासाठी रात्रीचा दिवस करून मेहनत घेऊन काम करा येणारी सत्ता तुमची असेल असे कैलाशनाथ पाठक यांनी सांगितले.यावेळी शिवसेना तालुका प्रमुख विलास पवार हंगरगेकर, संतोष रोडगे सर, उपतालुका प्रमुख अनिल लामतुरे, तिरुपती पाटील, संजय बुरसपट्टे, शिवा निडवदे, सुभाष गुंडीले, अनिकेत फुलारी, मनोज चामे, सुरेश अंकुलगे, पदमाकर पेंढारकर सह शिरूर ताजबंद पंचायत समितीचे सर्कल निहाय शाखा प्रमुख बूथ प्रमुख व शिवसैनिक उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!