“शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते प्रा. दत्ता गलाले यांच्या सेवानिवृत्ती निमित्त त्यांच्या जीवनावर टाकलेला क्रीडामय प्रकाश”

"शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते प्रा. दत्ता गलाले यांच्या सेवानिवृत्ती निमित्त त्यांच्या जीवनावर टाकलेला क्रीडामय प्रकाश"

जया अंगी मोठेपण
तया यातना कठीण
या थोर संतांच्या ऊक्तीप्रमाणे ज्यांची जन्मभूमी कर्मभूमी असलेल्या अहमदपूर शहरात दिनांक एक सप्टेंबर 1964 रोजी आई पदमीनबाई आणि पिता बाबुराव गलाले यांच्या पोटी प्रा.दत्ता गलाले यांचा जन्म झाला. त्यांचे आजोबा स्वातंत्र्यसैनिक स्वर्गीय राजाराम पांडुरंग गलाले यांचे आणि त्यांचे वडील यांचे दत्ता अतिशय लहान असताना अचानक निधन झाले. त्यामुळे त्यांच्या परिवाराची सर्व जबाबदारी मातोश्री यांच्यावर येऊन पडली. त्यांची कौटुंबिक परिस्थिती अत्यंत बेताची होती.

आईंना लहानपणी असे वाटायचे की माझा दत्ता शिकून त्याला सावलीतले काम करण्याची संधी मिळावी असे तिला मनोमन वाटत असे त्यामुळे पद्मिनबाईने आपल्या मुलाला वडील नसल्याची खंत कधी जाणू दिली नाही. कठीण प्रसंगी ती कधी आई व्हायची तर कधी बाप म्हणून भूमिका अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडायची.
बाल वयात वडिलांचे छत्र हरवल्याने ,अतिशय प्रामाणिकपणे आणि सचोटीने दत्ताने आपले प्राथमिक माध्यमिक शिक्षण घराच्या जवळच्या शाळेत यशवंत विद्यालयात पूर्ण केले. बारावी व पदवीचे शिक्षण महात्मा गांधी महाविद्यालयातून, एम ए लातूरच्या दयानंद महाविद्यालयातून तर बी एड चे शिक्षण शासकीय अध्यापक महाविद्यालय अंबाजोगाई येथून चांगल्या गुणांनी पूर्ण केले.
शिक्षण पूर्ण झाल्यानंतर जिद्द चिकाटी व परिश्रम असलेल्या दत्ताला नोकरीची गरज होती. त्यासाठी ते सबंध मराठवाडाभर अर्ज करत होते. त्यात त्यांना 16 मे 1989 रोजी अंबड कला व वाणिज्य महाविद्यालय अंबड तालुका अंबड जिल्हा जालना येथे कनिष्ठ महाविद्यालयामध्ये हिंदी विषयाचे प्राध्यापक म्हणून नेमणूक मिळाली. पण त्यांचे तेथे मन रमेना एक वर्ष सेवा केल्यानंतर 1990 मध्ये कला वाणिज्य महाविद्यालय किल्ले धारूर तालुका धारूर जिल्हा बीड येथे एक वर्ष सेवेनंतर त्यांची जन्मभूमी, कर्मभूमी असलेल्या अहमदपूर येथील महात्मा फुले विद्यालय मध्ये 16 जून 1991 ला प्राध्यापक म्हणून रुजू करून घेण्यात आले.

त्याकाळी शहरातील गलाले गल्लीचा पहिलाच प्राध्यापक असल्याने त्यांचा विवाह तत्कालीन लातूर मजूर फेडरेशनचे चेअरमन स्वर्गीय लक्ष्मण पाटील यांच्या कनिष्ठ भगिनी रेखा भीमराव पाटील यांच्या समवेत थाटामाटात संपन्न झाला.
प्राध्यापक दत्ता गलाले हे हिंदी विषयाचे अभ्यासू प्राध्यापक पण त्यांची विशेष रुची क्रीडा विभागांमध्येच होती. म्हणून सुरुवातीच्या नोकरीच्या कालावधीत ते खेळाकडे जाणीवपूर्वक लक्ष देत ते हिंदीचे प्राध्यापक असताना सुद्धा दोन सतरा मध्ये खेळांचा सराव घेत असत.
खरे म्हणजे हँडबॉल ,बास्केट बॉल यांच्यामध्ये रमणारे दत्ता अचानकपणे तलवारबाजीकडे वळले. अत्यंत प्रामाणिकपणे व सचोटीने तलवारबाजी चा जिवापाड सराव करून तलवार भाजीमध्ये राज्यपदक प्राप्त 300 खेळाडू आणि राष्ट्रीय पदक प्राप्त 17 खेळाडू असून त्या तज्ञानेश्वरी शिंदे, रोहित गलाले, माही आरदवाड, श्रीधर सोमवंशी ,आकाश बनसोडे, मोहसीन शेख यांची विशेष कामगिरी आहे.
नेट बोल च्या शालेय राज्य क्रीडा स्पर्धेत लातूर विभागात 35 वेळा राज्यात प्रथम, द्वितीय व तृतीय स्थानावर यश संपादन करून आपल्या नेत्रदीपक यशाची परंपरा कायम केली आहे. सोबतच फ्लॉवर बॉल या खेळामध्ये सुद्धा पाच ते सहा वेळा राज्यपदक प्राप्त केले असून बास्केटबॉल हँडबॉल या खेळासाठी पण नेत्रदीपक कामगिरी त्यांच्या खात्यावर जमा आहे.

भारत देशाचे तलवारबाजीत नेतृत्व ज्ञानेश्वरी शिंदे हिने 19 वर्ष वयोगटात कॉमनवेल्थ चॅम्पियनशिप लंडन येथे झालेल्या स्पर्धेत सिल्वर पदक प्राप्त केल्याने अहमदपूरच्या खेळाडूंना प्रेरणा प्रोत्साहन मिळाले असून सर्व खेळाडू ज्ञानेश्वरीचाआदर्श डोळ्यासमोर ठेवून विविध खेळांच्या मध्ये अटकेपार झेंडा रोवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहेत.
या खेळाच्या कार्यासाठी त्यांना जीवनगौरव पुरस्कार प्राप्त प्राध्यापक गणपतराव माने, कबड्डीचे राष्ट्रीय खेळाडू क्रीडा महर्षी कैलासवासी बाबुराव नलवाड ,तलवार भाजीला प्रोत्साहन देणारे शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते प्राध्यापक अशोक दुधारे यांचे अनमोल मार्गदर्शन त्यामुळे अहमदपूर सारख्या ग्रामीण भागातून तलवारबाजी मध्ये भारताचे कॉमनवेल्थ चॅम्पियनशिप लंडन येथे प्रतिनिधित्व केलेले आहे. हे अहमदपूरच्या शिरपेचा मध्ये मानाचा तुरा खोकल्यासारखे आहे.
तलवार बाजीमध्ये विशेष पुरस्कार
लातूर जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या वतीने अहमदपूर शहरातील सहा विद्यार्थ्यांना तलवारबाजी मध्ये विशेष पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आलेला आहे त्यात महात्मा फुले विद्यालयाचा रोहित गलाले पुरुष खेळाडू , वझुरुद्दीन काझी पुरुष खेळाडू, प्राध्यापक दत्ता गलाले यांना संघटक म्हणून पुरस्कार, मोहसीन शेख पुरुष खेळाडू म्हणून, कुमारी ज्ञानेश्वरी शिंदे महिला खेळाडू म्हणून तर प्राध्यापक अभिजीत मोरे यांना मार्गदर्शक म्हणून जिल्हास्तरावरचा पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आलेला आहे.
क्रीडा शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यामुळे प्राध्यापक दत्ता गलाले यांना सन 2015 16 चा महाराष्ट्र शासनाच्या वतीने दिला जाणारा शिवछत्रपती क्रीडा पुरस्काराने तत्कालीन शिक्षण मंत्री नामदार विनोद तावडे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले आहे.

हाच त्यांच्या जीवनातील क्षण सुवर्ण अक्षराने लेखन करून ठेवण्यासारखा आहे. कारण ते हिंदी विषयाचे प्राध्यापक त्यांचा हिंदी विषयाचा निकाल अत्यंत नेत्र दीपक पण मूळ त्यांचा पिंड क्रीडा विभागाकडे म्हणून त्यांनी सकाळच्या सत्रात एक तास व संध्याकाळच्या सत्रात तीन तास या खेळाडूचा ऊन ,वारा, वादळ ,पाऊस असतानाही सराव घेतला म्हणून महाराष्ट्रात तलवारबाजी च्या मुलांची नावे अहमदपूर शहराची अत्यंत आदराने घेतली जातात.
शिक्षणात महाराष्ट्रात अहमदपूर पॅटर्नची ओळख यशवंत विद्यालय आणि महात्मा गांधींनी करून दिली तर तलवारबाजी मध्ये महाराष्ट्राला ओळख प्राध्यापक दत्ता गलाले आणि त्यांच्या सहकारी प्राध्यापकांच्या कामामुळे झालेली दिसते हे विशेष उल्लेखनीय होय.
प्राध्यापक दत्ता गलाले सेवानिवृत्त झाल्यानंतर ते एकच ध्यास माझ्या खेळाडूचा विकास हा मंत्र घेऊन काम करणार असून जास्तीचा वेळ तलवारबाजी करिता देणार असल्याचे सांगून तलवारबाजी मध्ये नॅशनल खेळाडू आहेत परंतु भविष्यात एशियन गेम ,कॉमनवेल्थ गेम, ओलंपिक स्पर्धेपर्यंत अहमदपूरच्या खेळाडूंनी मजल मारावी यासाठी शहर आणि तालुक्यातील खेळप्रेमी नागरिकांनी पुढे येऊन सकारात्मक मदत करावी असे जाहीर आवाहन केले आहे.
खरं म्हणजे तलवारबाजी हा खेळ अत्यंत खर्चिक असून सुद्धा राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर तलवारबाजीचा धबधबा आपल्या शहरातील खेळाडूंनी कायम ठेवलेला आहे.
त्यांना एक विवाहित बहीण असून त्यांना तीन अपत्य आहेत त्यात मुलगी डॉक्टर आरती जावई डॉक्टर पवन सावंत दुसरी मुलगी डॉक्टर माधवी गलाले तर तिसरा मुलगा डॉक्टर रोहित गलाले आहे. प्राध्यापक दत्ता गलाले हे नियमितपणे चार तास खेळाच्या मैदानावर असल्यामुळे त्यांना आज तारखेपर्यंत कुठल्याही प्रकारचा आजार जडलेला नाही .खेळणे हाच त्यांचा आजार असून कुठे मित्राकडे पाहुण्याच्या घरी गेल्याच्या नंतर तरुण मुला-मुलींना मैदानावर या मातीशी नातं जोडा तरच तुमच्या शरीर स्वास्थ चांगलं राहील असा मार्मिक संदेश ते गेल्या 25 वर्षापासून देतात हे विशेष होय.

शिक्षण क्षेत्राबरोबरच क्रीडा क्षेत्रातही उल्लेखनीय काम असल्याने क्रीडाप्रेमी नागरिकांच्या वतीने त्यांचा वर्षा गार्डन येथे भव्य नागरी सत्कार दिनांक 31 रोजी अहमदपूर चाकूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते गौरव करण्यात येणार आहे यावेळी प्रमुख अतिथी म्हणून माजी मंत्री विनायकराव पाटील, मराठवाडा शिक्षक मतदार संघाचे आमदार विक्रम काळे, शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते प्राध्यापक गणपतराव माने व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये नागरी सत्काराचे आयोजन दीप वर्षा मंगल कार्यालयात करण्यात आले आहे. या सोहळ्यालाही क्रीडाप्रेमी नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

रामलिंग तत्तापूरे

About The Author