अहमदपूरच्या महात्मा फुले महाविद्यालयाच्या समूहगीताला युवक महोत्सवात प्रथम पारितोषिक
अहमदपूर (गोविंद काळे) : येथील महात्मा फुले महाविद्यालयाच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अभ्यास केंद्राला विभागीय युवक महोत्सवात समूहगीतामध्ये प्रथम पारितोषिक प्राप्त झाले.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक च्या नांदेड विभागीय केंद्रातर्फे दि. २४ सप्टेंबर २०२२ रोजी विभागीय युवक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या युवक महोत्सवात महात्मा फुले महाविद्यालयाच्या अभ्यास केंद्रातील विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक प्रकारामध्ये आपला सहभाग नोंदविला. त्यात, समूहगीत या कलाप्रकारात महाविद्यालयाच्या अभ्यास केंद्राच्या विद्यार्थ्यांना प्रथम पारितोषिक प्राप्त झाले. या समूहगीत कलाप्रकारामध्ये कु. देवकते जान्हवी नागनाथ, कु. कराड प्राजक्ता मारोती, कु.गोणे आकांक्षा अण्णाराव, कु. कराड अश्विनी प्रभाकर या विद्यार्थिनींनी सहभाग घेतला होता. त्यांना केंद्र संयोजक प्रो. डॉ. अनिल मुंढे, केंद्र सहाय्यक डॉ. संतोष पाटील व सौ. सीमा गित्ते यांनी मार्गदर्शन केले होते. यशस्वी विद्यार्थ्यांचे व संघप्रमुखांचे किसान शिक्षण प्रसारक मंडळ उदगीरचे अध्यक्ष सचिव यांच्यासह मंडळाचे सर्व पदाधिकारी तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य, उपप्राचार्य तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी व विद्यार्थ्यांनी अभिनंदन करून पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या.