पर्यटन व सांस्कृतिक महोत्सव समिती जिल्हाध्यक्षपदी व्ही. एस. कुलकर्णी, सचिव गणेश मुंडे
उदगीर (एल.पी.उगीले) : महाराष्ट्र राज्य पर्यटन व कला ,सांस्कृतिक महोत्सव समितीच्या लातूर जिल्हाध्यक्ष पदी जेष्ठ पत्रकार व्ही. एस. कुलकर्णी(हत्तीबेट पर्यटन स्थळ देवर्जन ता.उदगीर )यांची तर सचिव पदी पत्रकार गणेश मुंडे (श्री समर्थ धोंडूतात्या देवस्थान तीर्थक्षेत्र डोंगरशेळकी ता. उदगीर)यांची नियुक्ती राज्य पर्यटन भूषण व महोत्सव समितीचे सचिव उमाजी बिसेन यांनी केली आहे.
महाराष्ट्र राज्य पर्यटन धोरण 2016 अंतर्गत पर्यटन महोत्सव 2010 च्या धोरणानुसार लातूर जिल्ह्यातील जेष्ठ कलावंत, पर्यटन संशोधक, पर्यटन प्रेमी व पर्यावरण प्रेमी, पारंपरिक लोक कलावंत यांची दखल घेवून महोत्सवाच्या संकल्पना राबविणे, पर्यटन स्थळाचा शोध घेवून शासनास सहकार्य करणे. यासाठी महोत्सव समितीचे कार्याध्यक्ष माजी आमदार रामभाऊ गुंडीले व भा ज पा चे प्रदेश कार्यकारणी सदस्य बालाजी गवारे यांच्या शिफारशीनुसार पत्रकार कुलकर्णी व मुंडे यांची नियुक्ती 17 डिसेंम्बर 2024 पर्यंत करण्यात आली आहे.