३४३ रुग्णांनी कोरोना वर केली मात

३४३ रुग्णांनी कोरोना वर केली मात

नवीन २५० कोरोनाबाधित रुग्ण

लातूर (प्रतिनिधी) : लातूर जिल्ह्यात आज ३४३ कोरोनाबाधित रुग्ण उपचाराने बरे झाले आहेत तर आजपर्यंत जिल्ह्यातील ८२७४० रुग्ण उपचाराने आजपर्यंत बरे झाले आहेत. आज नवीन २५० कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. उपचारादरम्यान २० रुग्णांचा मृत्यू झाला आहे, असे प्रशासनाने जाहीर केले आहे.

लातूर जिल्ह्यात आज १२६३ आरटीपीसीआर चाचणीसाठी नमुने घेण्यात आलेले आहेत. १२६ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. २५८१ रॅपीड अ‍ॅन्टीजीन टेस्ट करण्यात आल्या. त्यामध्ये १२४ जण पॉझिटिव्ह आढळून आले. जिल्ह्यातील आजपर्यंत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ८८१४६ झाली आहे. उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या ३३७४ आहे. लातूर जिल्ह्यात आज २० रुग्णांचा मृत्यू झाल्याचे जाहिर करण्यात आले तर आजपर्यंत २०३२ रुग्णांचा मृत्यू झाला असून उपचार घेऊन बरे झालेल्या रुग्णांची संख्या ८२७४० आहे. आज बरे झालेल्या रुग्णांची संख्या ३४३ आहे.

About The Author