दिवसभरात बरे झालेल्या रुग्णांची संख्या 426

दिवसभरात बरे झालेल्या रुग्णांची संख्या 426

नवीन 193 कोरोनाबाधित रुग्ण

लातूर (प्रतिनिधी) : लातूर जिल्ह्यात आज 426 कोरोनाबाधित रुग्ण उपचाराने बरे झाले आहेत तर आजपर्यंत जिल्ह्यातील 83166 रुग्ण उपचाराने आजपर्यंत बरे झाले आहेत. आज नवीन 193 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. उपचारादरम्यान 22 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, असे प्रशासनाने जाहीर केले आहे.

लातूर जिल्ह्यात आज 1123 आरटीपीसीआर चाचणीसाठी नमुने घेण्यात आलेले आहेत. 105 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. 1924 रॅपीड अ‍ॅन्टीजीन टेस्ट करण्यात आल्या. त्यामध्ये 88 जण पॉझिटिव्ह आढळून आले. जिल्ह्यातील आजपर्यंत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 88316 झाली आहे. उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 3096 आहे. लातूर जिल्ह्यात आज 22 रुग्णांचा मृत्यू झाल्याचे जाहिर करण्यात आले तर आजपर्यंत 2054 रुग्णांचा मृत्यू झाला असून उपचार घेऊन बरे झालेल्या रुग्णांची संख्या 83166 आहे. आज बरे झालेल्या रुग्णांची संख्या 426 आहे.

About The Author