लातूर जिल्ह्यात ३८९ रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

लातूर जिल्ह्यात ३८९ रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

नवीन १८८ कोरोनाबाधित रुग्ण

लातूर (प्रतिनिधी) : लातूर जिल्ह्यात आज ३८९ कोरोनाबाधित रुग्ण उपचाराने बरे झाले आहेत तर आजपर्यंत जिल्ह्यातील ८३५५५ रुग्ण उपचाराने आजपर्यंत बरे झाले आहेत. आज नवीन १८८ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. उपचारादरम्यान २५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, असे प्रशासनाने जाहीर केले आहे.

लातूर जिल्ह्यात आज १०३७ आरटीपीसीआर चाचणीसाठी नमुने घेण्यात आलेले आहेत. ७० कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. २३०५ रॅपीड अ‍ॅन्टीजीन टेस्ट करण्यात आल्या. त्यामध्ये ११८ जण पॉझिटिव्ह आढळून आले. जिल्ह्यातील आजपर्यंत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ८८४९४ झाली आहे. उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या २८६० आहे. लातूर जिल्ह्यात आज २५ रुग्णांचा मृत्यू झाल्याचे जाहिर करण्यात आले तर आजपर्यंत २०७९ रुग्णांचा मृत्यू झाला असून उपचार घेऊन बरे झालेल्या रुग्णांची संख्या ८३५५५ आहे. आज बरे झालेल्या रुग्णांची संख्या ३८९ आहे.

About The Author