औराद ग्रामसेवकांनी माहिती अधिकाराला दाखवली केराची टोपली.माहिती आयोगाने मारली त्यांना दहा हजाराची टपली

औराद ग्रामसेवकांनी माहिती अधिकाराला दाखवली केराची टोपली.माहिती आयोगाने मारली त्यांना दहा हजाराची टपली

निलंगा (भगवान जाधव) : माहीती आयोगाने ठोठावला दहा हजाराचा दंड. औराद शहजणी येथील ग्रामसेवकांना दोन प्रकरणातुन प्रत्येकी पाच पाच हजाराच्या दंडात्मक कार्यवाही करण्याचे राज्य माहिती आयोग संभाजीनगर खंडपीठाचे आदेश.औराद शहाजानी येथील ग्रामपंचायतीच्या ग्रामविकास अधिकाऱ्याला माहिती अधिकारांतर्गत माहिती न दिल्याप्रकरणी राज्य माहिती आयोगाने दोन प्रकरणातुन दहा हजारांचा दंड ठोठावला आहे. औराद शहाजानी येथील भागवत फुलचंद बोंडगे , व अजय बब्रुवान माकणे यांनी औराद ग्रामपंचायत कार्यालयाचे जनमाहिती अधिकारी तथा ग्रामविकास अधिकारी यांच्याकडे माहिती अधिकार कायद्यांतर्गत अर्ज करुन माहिती मागितली होती. परंतु ग्रामविकास अधिकाऱ्यांनी विहित मुदतीत माहिती न देता दोन वर्षापासुन सदर अर्जावर कार्यवाही केली नाही व आवश्यक माहिती दिली नाही. त्यामुळे अर्जदार भागवत बोंडगे व अजय माकणे यांनी त्यासंदर्भात राज्य माहिती आयोग, संभाजीनगर खंडपीठाकडे अपील केले होते. राज्य माहिती आयोगाने सुनावणी घेतली असता संबंधित ग्रामविकास अधिकार्‍याकडे खुलासा मागितला होता. परंतु त्यांनी खुलासा सादर केला नाही. सुनावणीमध्ये या दोन्ही प्रकरणात राज्य माहिती आयुक्त यांनी सखोल अभ्यास करीत निर्णय देत संबंधित जनमाहिती अधिकाऱ्याने माहिती अधिकार कायदा, २००५ अन्वये आवश्यक माहिती न दिल्यामुळे नियमाचा भंग केला असल्याचे आदेशात नमूद केले आहे. म्हणून त्यांना प्रत्येकी अर्जावर पाच हजार रुपयांचा दंड प्रमाणे दोन प्रकरणात दहा हजार रुपयाचा दंड ठोठावला आहे आणि तो दंड संबंधित ग्रामविकास अधिकाऱ्यांकडुन वसुल करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, लातूर यांना दिलेले आहेत. यावर भागवत बोंडगे आणी अजय माकणे यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी राज्य माहिती आयोगाने नियमानुसार प्रत्येकी २५ हजार रुपयाचा दंड करत ५० हजार रुपये दंड आकारणे योग्य असताना उलट छोटीशी दंडात्मक कार्यवाही करण्याचे आदेश दिलेले आहेत त्यामुळे या निकालाच्या विरुद्ध जनहित याचिका दाखल करुन योग्य दंडात्मक कार्यवाही करणार आसल्याचे सांगितले.

About The Author