‘सिध्दी शुगर’ परिवाराकडून अविनाश भैय्या जाधव यांचा सत्कार

'सिध्दी शुगर' परिवाराकडून अविनाश भैय्या जाधव यांचा सत्कार

अहमदपूर ( गोविंद काळे ) : राज्य ऊसनियंत्रण मंडळ समितीच्या सदस्यपदी सिद्धी शुगरचे व्यवस्थापकीय संचालक अविनाश बाळासाहेब जाधव साहेब यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सिद्धी शुगर परिवाराच्या वतीने अहमदपूर मतदार संघाचे आमदार तथा पणन महासंघाचे चेअरमन व सिद्धी शुगरचे चेअरमन बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते सत्कार करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
यावेळी सिध्दी शुगरच्या संचालिका दिपाली जाधव, सिद्धी शुगरचे व्हाईस प्रिसीडेंट पी.जी. होनराव, टेक्नीकल जनरल मॅनेजर बी.के. कावलगुडेकर, जनरल मॅनेजर (केन ) पी.एल. मीटकर, कंपनी सेक्रेटरी संतोष सावंत, चीफ अकौंटंट एल.आर. पाटील, जी.बी.माने आदींची उपस्थिती होती.

About The Author

error: Content is protected !!