वंचित बहुजन आघाडीचे मुख्यमंत्र्यांना विविध मागण्यांचे निवेदन

वंचित बहुजन आघाडीचे मुख्यमंत्र्यांना विविध मागण्यांचे निवेदन

अहमदपूर ( गोविंद काळे) :
वंचित बहुजन आघाडी अहमदपूर कार्यकारणीच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना विविध मागण्यांचे निवेदन अहमदपूर तहसील कार्यालय मार्फत देण्यात आले.
सविस्तर वृत्त असे की महाराष्ट्रासह देशभरामध्ये मागच्या एक-दीड वर्षापासून कोरोना महामारी चे संकट सुरू असल्याने शेतकरी,शेतमजूर, कामगार, छोटे व्यापारी, विद्यार्थी या सर्व वर्गांचे बेहाल होत आहेत. त्यामुळे अहमदपूर तालुका वंचित बहुजन आघाडी चे तालुकाध्यक्ष सहदेव होनाळे यांच्या नेतृत्वाखाली अहमदपूर तहसील कार्यालयामार्फत मुख्यमंत्र्यांना ज्वलंत प्रश्नावर आधारीत विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यामध्ये मागील वर्षाच्या मंजूर पीक विम्याचे वाटप तात्काळ करण्यात यावे ,अकोला पॅटर्नच्या धर्तीवर महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांना मोफत खते व बियाणे देण्यात यावे, लाॅकडाऊन काळातील शेतमजूर, बांधकाम कामगार व इतर मजुरांना निर्वाह भत्ता देण्यात यावा, डिझेल ,पेट्रोल व खाद्य तेलाच्या वाढत्या किंमती त्वरित कमी करण्यात याव्यात, विद्यार्थ्यांना लवकरात लवकर लसीकरण करून शाळा पूर्ववत सुरू कराव्यात, दहावी व बारावीच्या परीक्षांचा पालक आणि विद्यार्थी यांच्यात सुरू असलेला संभ्रम शासनाने लवकर निकाली काढावा, पदोन्नतीतील आरक्षणाचा कायम शासन आदेश काढावा, कोरोना काळामध्ये आई-वडील मृत्युमुखी पडल्याने अनाथ झालेल्या मुलांचे पालकत्व शासनाने स्वीकारावे, तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र व्हेंटिलेटर व ऑक्सिजनसह सुसज्ज ठेवावेत, तसेच लॉकडाउन काळातील सरसकट वीजबिल माफ करण्यात यावे अशा मागण्यासह मुख्यमंत्र्यांना वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बहुजन हृदय सम्राट श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली अहमदपूर तालुका वंचित बहुजन आघाडी चे तालुकाध्यक्ष सहदेव होनाळे लातूर जिल्हा उपाध्यक्ष सुनील दहीकांबळे महासचिव प्रल्हाद ढवळे ,सारीपुत्र ढवळे व पदाधिकारी बाबासाहेब वाघमारे, विनय कुमारढवळे ,संतोष गायकवाड ,मौलाना बिलाल शेख, सय्यद तबरेज, संजय वाहुळे, तुकाराम कांबळे ,आदित्य वाहुळे, सचिन शृंगारे आदी पदाधिकाऱ्यांसह निवेदन देण्यात आले. या निवेदनावर आघाडी सरकारने लवकरात लवकर लक्ष घालून तात्काळ अंमलबजावणी करावी अन्यथा एडवोकेट श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली सबंध महाराष्ट्रभर वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्रातील शेतकरी ,शेतमजूर, कामगार ,व्यापारी ,विद्यार्थी यांच्या न्याय हक्कासाठी पुढील काळात तीव्र आंदोलन करेल असा इशारा निवेदना मार्फत देण्यात आला आहे.

About The Author

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!