स्वस्त धान्य दुकानदार संघटना अहमदपूरच्या वतीने गरजूंना अन्नधान्य कीटचे वाटप

स्वस्त धान्य दुकानदार संघटना अहमदपूरच्या वतीने गरजूंना अन्नधान्य कीटचे वाटप

किनगाव (गोविंद काळे) : स्वस्त धान्य दुकानदार संघटना अहमदपूर यांच्या वतीने पालावर राहणाऱ्या कुटुंबांना अन्नधान्य किटचे वाटप शुक्रवारी किनगाव येथे उपजिल्हाधिकारी प्रमोद कुदळे यांच्या हस्ते करण्यात आले. सध्या कोरोना संकटामुळे पालावर राहणाऱ्या भटक्या समाजाला इतर गावांमध्ये भटकंती करून उदरनिर्वाह करण्यास गावकरी मज्जाव करीत आहेत. त्यामुळे त्यांची उपासमार होत आहे. किनगाव येथील पालीवर राहणाऱ्या 21 कुटुंबांना या अन्नधान्य कीटचे वाटप करण्यात आले. या किटमध्ये गहू दहा किलो, तांदूळ पाच किलो, गोडेतेल, मीठ, तुरदाळ, साबण, बिस्किट, मिरची पावडर, हळदी पावडर , मसाला आदी जीवनावश्यक वस्तूंचा समावेश आहे. यावेळी तहसीलदार प्रसाद कुलकर्णी, पुरवठा विभाग नायब तहसीलदार डी. के. मोरे, सरपंच किशोर मुंडे, स्वस्त धान्य दुकानदार संघटना तालुकाअध्यक्ष विकास देशमुख, सचिव शिवानंदाप्पा चावरे, उपाध्यक्ष संजय मलशेट्टे,बालाजी कांबळे, उदय गुंडीले, मोतीराम जायभाये, व्यंकटराव मुंढे, निळकंट बावगे, माणिक मुंढे, ग्रामपंचायत सदस्य धम्मानंद कांबळे आदीं सह स्वस्त धान्य दुकानदार यांची उपस्थिती होती.

About The Author