देशी दारूचे दहा बॉक्स जप्त

देशी दारूचे दहा बॉक्स जप्त

औराद शहा (भगवान जाधव) : पोलिस हद्दीतील आंबुलगा गावात दहा बॉक्स देशी दारू पकडण्यात औराद पोलिसांना यश आलेले आहे.

एका गुप्त खबऱ्याच्या माहिती वरुन अंबुलगा गावात पत्र्याच्या शेडमध्ये अवैध्य देशी दारू विकत असल्याची माहिती मिळताच औराद पोलिस ठाण्याचे ए पी आय सुधीर सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदीप गौड यांच्या मदतीने टीम तयार केली व अंबुलगा येथे सापळा रचून अत्यंत शितापिने त्या पत्र्याच्या शेडमध्ये शिरून पाहिले असता लखन पाटील हा इसम देशी दारू विकत असल्याचे आढळून येताच त्याला जेरबंद करण्यात आले. व सदरील देशी दारूचे दहा खपटी बॉक्स हस्तगत करून औराद पोलिस स्टेशन येथे आणून पोलिस कर्मचारी नारीन धोंडीराम तपसे वय 35 पो हे 1459 पोलिस स्टेशन औराद यांच्या फिर्यादवरून दुपारी 16.26 वाजता 99/2021 कलम 65 इ मू पो का नुसार लखन पाटील रा. अंबुल्गा यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला. यामुळे ए एस आय प्रदीप गौड व त्यांच्या टीमचे परिसरात वाह वाह केली जात आहे. व परिसरातील तगरखेडा, हलसी, हलगरा, बोरसुरी या परिसरात सुद्धा मोठ्या प्रमाणात अवैध दारू विक्री होत आहे याकडे सुद्धा लक्ष देत परिसरातील दारूमुळे उध्वस्त होणारे संसार थांबवावे अशी जनतेची मागणी होत आहे.

About The Author