प्रियकरासोबतचा अश्लिल व्हिडीओ दाखवून तरुणीवर सामूहिक बलात्कार

प्रियकरासोबतचा अश्लिल व्हिडीओ दाखवून तरुणीवर सामूहिक बलात्कार

 पुणे ( रफिक शेख ) : पुणे येथे एका प्रेमी युगुलाला रंगेहात पकडून त्यांचा अश्लील व्हिडिओ बनवून सदरील व्हिडिओ व्हायरल करायची धमकी देत त्या तरुणीवर सामूहिक बलात्काराची दुर्दैवी घटना घडली आहे. पिंपरी-चिंचवड मध्ये सदरील प्रकार घडला असून पीडित महिलेने वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून आपल्यावरील अन्यायाची कहाणी सांगितल्यानंतर गुन्हे शाखा युनिट 2 ने सदरील प्रकरणातील आरोपींना अटक केली आहे. प्रियकरा सोबत शारीरिक संबंध ठेवलेला व्हिडिओ इतरांना पाठवण्याची धमकी देऊन बलात्कार करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी प्रियकरासह चार आरोपीतांना अटक केली आहे. तर 2 विधीसंघर्ष बालक फरार आहेत. यासंदर्भात पुणे पोलीस अधिक तपास करत आहेत. या प्रकरणांमध्ये अरबाज खान, सुलतान उर्फ मुस्ताक सय्यद, रियाज उर्फ मनन खान व सोहेल शेरअली पिरजादे त्यांना गुन्हे शाखेने अटक केल्याचे सांगण्यात येते.

 पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 22 वर्षीय पीडित तरुणी आणि आरोपी अरबाज खान यांचे प्रेम संबंध होते. त्यांचा शारीरिक संबंध ठेवतानांचा व्हिडिओ आरोपी मुस्तफा सय्यद ने मोबाईल मध्ये बनवला, नंतर हाच व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन त्या तरुणीवर मुश्ताक आणि त्याच्या इतर मित्रांनी सामूहिक बलात्कार केल्याची दुर्दैवी घटना घडली. वेळोवेळी पीडित तरुणीला या लोकांकडून होत असलेला त्रास पाहून, पीडितेने पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांची भेट घेऊन आपल्यावरील झालेल्या प्रसंगाची माहिती दिल्यानंतर वरिष्ठांच्या आदेशानुसार देहूरोड पोलिसात गुन्हा दाखल करून गुन्हे शाखा युनिट दोनने आरोपींना अटक केली आहे. अल्पवयीन आरोपी बालकांचा शोध पोलीस घेत आहेत.

About The Author