शहिद गौतम वाघमारे चौकाच्या नामफलकाचे अनावरण

शहिद गौतम वाघमारे चौकाच्या नामफलकाचे अनावरण

अहमदपूर ( गोविंद काळे ) : शहरातील हिना लाॅज च्या समोर आता नव्याने नामांतर वीर शहिद गौतम वाघमारे चौकाची स्थापना करून या नामफलकाचे अनावरण मोठ्या उत्साहात करण्यात आले.
विद्यापीठ नामांतर लढ्यात गौतम वाघमारे यांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले असून या वीराचे स्मरण रहाण्यासाठी या चौकाची स्थापना नगर परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे.

चौकाला नांव देण्याची येथील नागरिकांची गेल्या पंचवीस वर्षीपासून ची मागणी होती. या प्रभागातील नगरसेविका तनूजाताई सिध्दार्थकुमार सूर्यवंशी यांनी या बाबत न.प.मध्ये विषय मांडून या चौकाला शहिद गौतम वाघमारे यांचे नांव देण्याचा ठराव मंजूर करून घेतला होता.

या चौक नामफलकाच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा अश्वीनीताई कासनाळे या होत्या तर उद्घाटक म्हणून जेष्ठ नेते संजयभाऊ कांबळे हे होते.
या वेळी प्रमुख उपस्थिती म्हणून माजी नगराध्यक्षा सरस्वतीबाई कांबळे,युवकनेते डाॅ.सिध्दार्थकुमार सूर्यवंशी,महेंद्र ससाणे,कार्यकारी सभापती प्रशांत जाभाडे,अणाराव सूर्यवंशी,दिलीप शिंदे,शरद सोनकांबळे,शरद कांबळे,रवी गायकवाड,राणी गायकवाड,धम्मानंद कांबळे,शिवाजीराव भालेराव,दिलीप भालेराव,मच्छींद्र सोनकांबळे,आनंदभाऊ सोनकांबळे,आदींची उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युवक नेते डाॅ.सिध्दार्थकुमार सूर्यवंशी यांनी केले तर आभार प्रकाश लांडगे यांनी मानले.

About The Author

error: Content is protected !!