भारत राठोड यांच्या वाढदिवस सप्ताहाच्या निमित्त वृक्षा रोपण

भारत राठोड यांच्या वाढदिवस सप्ताहाच्या निमित्त वृक्षा रोपण

उदगीर (प्रतिनिधी) : नवनाथ गायकवाड मराठवाडा मित्र मंडळाच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या उदगीर नगर परिषदेचे कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी भारत राठोड यांच्या वाढदिवस सप्ताहाच्या चौथ्या व पाचव्या दिवशी नवनाथ गायकवाड मित्र मंडळाचे संस्थापक नवनाथ गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली उदयगिरी लॉयन्स नेत्ररुग्नालय उदगीर येथे अंध विद्यार्थ्यांना राशन, मास्क, उदगीर ग्रामीण पोलिस स्टेशन येथे सेनिटायझर व मास्क, संत ज्ञानेश्वर विद्यामंदिर व रामकॄष्ण पब्लिक स्कुल येथे वॄक्षारोपण व वॄक्ष वाटप असे विविध उपक्रम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले.
या कार्यक्रमाप्रसंगी उदयगिरी लॉयन्स नेत्ररुग्नालयाचे अध्यक्ष डॉ. आर .एन. लखोटिया, उदगीर ग्रामीण पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक दिपककुमार वाघमारे, लातूर जिल्हा युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष विजय निटुरे, संत ज्ञानेश्वर शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.अनिता जगताप, नवनाथ गायकवाड, विजय चवळे, अमोल घुमाडे, व्ही एस कणसे, व्यंकट बोईनवाड, बाबा खतीब, अरविंद पत्की, वट्टमवार सर, अजमत खान, इंजि. आकाश झिल्ले, बाळू चिंचोलकर, प्रा. मदन पाटील, शंकर मुक्कावार, अविनाश गायकवाड, युवराज जोमदे, प्रशांत कुलकर्णी, रामभाऊ बेलाळे, संदीप चिखले, संजयभाऊ बोरोळे, सुदाम दुडीले सर, मारोती बालूरे सर, मंगेश मंदाडे, दत्तात्रेय कालोजी, सुनील देवनाळे, माणिक बुके, संतोष पांढरे, सुशील बोमद्दरे, मनीष मुळे इत्यादींच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाले.

About The Author

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!