भीषण अपघातात स्थापत्य अभियंत्याचा जागीच मृत्यु

भीषण अपघातात स्थापत्य अभियंत्याचा जागीच मृत्यु

पुणे (रफिक शेख) : एका भरधाव जाणाऱ्या अज्ञात वाहनाने दुचाकीवरुन जाणाऱ्या स्थापत्य अभियंत्यांना जोरदार धडक दिल्याने स्थापत्य अभियंता अमित शेषराव सरदेशपांडे (वय 43 आनंदनगर) हे जागेवरच मरण पावले. आपल्या दुचाकीवरून ते घरी जात असताना, काल दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास वडगाव ब्रिज ते नवले ब्रिज च्या दरम्यान अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिल्याने ते जागीच ठार झाले आहेत. या अपघातानंतर वाहन चालक पसार झाला असून या अज्ञात वाहनचालकाच्या विरुद्ध मयत अमित सरदेशपांडे  यांचे सासरे धनंजय मारणे यांनी सिंहगड रोड पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्यावरून अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अमित सरदेशपांडे स्थापत्य अभियंता होते. कोरोना संसर्गाच्या काळात लाॅक डाऊन मध्ये त्यांची नोकरी गेली. ते सध्या घरीच राहत होते. काल दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास बाहेरून ते घरी जात असताना अज्ञात वाहणाने जोरदार  धडक देऊन वाहन चालक न थांबता पसार झाला आहे. या अपघातात सर देशपांडे यांचा मृत्यू झाला.

 याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास घेवारे, पोलीस उपनिरीक्षक धोत्रे आणि त्यांचे पथक त्या अज्ञात वाहन चालकाचा शोध घेत आहेत. एका तरुण अभियंत्याचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

About The Author