बोधेनगरमध्ये घरातून गांजा जप्त; ४१ वर्षीय व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल

Written by

in

लातूर (प्रतिनिधी)

लातूर शहरातील बोधेनगर परिसरात बेकायदेशीररीत्या गांजा बाळगल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी कारवाई करत ९ हजार २०० रुपये किमतीचा ४६० ग्रॅम गांजा जप्त केला आहे. याप्रकरणी कलप्पा रमू मुनोळी (वय ४१, व्यवसाय मजुरी, रा. बोधेनगर, लातूर) याच्याविरुद्ध अंमली पदार्थ आणि मनःप्रभावी पदार्थ कायद्यान्वये (एनडीपीएस) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राहत्या घरातून गांजा जप्त

१२ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी २.१० वाजण्याच्या सुमारास बोधेनगर येथील आरोपीच्या राहत्या घरात पोलिसांना ४६० ग्रॅम गांजा आढळून आला. हिरवट-पिवळसर रंगाचा, पाला, काड्या व बिया मिश्रित तसेच उग्र वास असलेला हा गांजा बेकायदेशीररीत्या बाळगल्याचे निदर्शनास आले. त्याची किंमत ९ हजार २०० रुपये असून, पोलिसांनी तो जप्त केला.

एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल

या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील पोलीस अमलदार संदेश समुखराव यांच्या फिर्यादीवरून १२ ऑक्टोबर रोजी रात्री ११.३३ वाजता गुन्हा रजिस्टर क्रमांक ४८४/२०२६ अन्वये एनडीपीएस कायद्याच्या कलम ८(क) व २०(ब) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *