निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय होणार नाही – प्रदेशाध्यक्ष अॅड.मोहम्मद खान पठाण

निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय होणार नाही - प्रदेशाध्यक्ष अॅड.मोहम्मद खान पठाण

लातूर (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष अॅड.मोहम्मद खान पठाण यांनी शासकीय विश्रामगृह लातूर येथे लातूर शहर जिल्हाध्यक्ष मकरंदभैय्या सावे, लातूर शहर जिल्हा कार्याध्यक्ष प्रशांतजी पाटील यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी अल्पसंख्यांक पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सर्वसामान्य निष्ठावंत,काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना न्याय देणारा एकमेव राजकीय पक्ष असून अल्पसंख्याक समाजाला न्याय देण्याचे कार्य करणारा असल्याचे सांगून पक्षात नवीन प्रवेश घेणा-यांची लांबच लांब रांग असून पडत्या काळात पक्षाची मोट बांधून काम करणा-या निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय होणार नाही याची काळजी पुर्वक दखल घेण्यात येणार आहे. आगामी काळात होणाऱ्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व पदाधिका-यासह व अल्पसंख्याक विभागाच्या सर्व कार्यकर्त्यांनी सज्ज राहण्यास सांगितले.निवडणूक जवळ आली की, मुस्लिम धर्माचा वापर करणारा एमआयएम AMIMI हा पक्ष मुस्लिम धर्मातील आरएसएस( RSS)चे काम करून भाजपा धार्जिण राजकारण करत असल्याचे सांगून मुस्लिम धर्मातील विशेषतः तरूणांनी याकडे लक्षात घेवून मत विभागणी टाळावी असे आवाहन केले.

यावेळी अल्पसंख्याक लातूर शहर जिल्हाध्यक्ष पदी फिरोज(टिल्लू) शेख यांची फेरनिवडीचे पत्र राष्ट्रवादी अल्पसंख्यांक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अॅड.मोहम्मद खान पठाण, लातूर शहर जिल्हाध्यक्ष मकरंदभैय्या सावे, लातूर शहर कार्याध्यक्ष प्रशांतजी पाटील, प्रदेश उपाध्यक्ष वसीम बु-हाण, प्रदेश उपाध्यक्ष मसूद शेख, प्रदेश उपाध्यक्ष हुजूर इनामदार, फारूख मटके, जावेद कुरेशी, प्रदेश सचीव मुफ्ती फय्याज, विद्यार्थी शहर जिल्हाधक्ष विशाल विहीरे, अकबर शेख, फेरोज सय्यद, युवक शहराध्यक्ष समीर शेख, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे मुन्ना तळेकर, जहाँगीर शेख, हनमंत रजपुत, खमर काझी, मुना खान, राष्ट्रवादी अर्बन सेल तथा आय टी सेलचे शहर जिल्हाध्यक्ष डी.उमाकांत, कबीर शेख यांच्या उपस्थितीत देण्यात आले. यावेळी अम्मु खान, चाँद खान, इस्माईल हाशमी, तोसिफ़ शेख, अज़हर शेख, शाहरुख तंबोली, आसिफ पठान, शाहरुख शेख, सय्यद मदनी साहब, वसीम शेख, साहील तांबोळी, मेहराज सिद्दीकी, समद शेख, मुस्ताफा किल्लारीकर, इम्तियाज शेख, इलियास सय्यद, अकबर, परवेझ सय्यद, मोईन शेख, इब्राहिम शेख, अब्दुल शेख,आफताब शेख, फय्याज तांबोळी, आकाश मस्के, सविनय शिंदे, परवेझ सय्यद, बाबा मोमीन,यादी उपस्थित होते.

About The Author

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!