माध्यमिक शिक्षकांच्या पदोन्नती, बदली प्रश्नांवर शिक्षण आयुक्त व संचालकांशी सकारात्मक चर्चा

Written by

in

लातूर (प्रतिनिधी) जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षकांच्या पदोन्नती, आंतरजिल्हा बदली व इतर प्रलंबित प्रश्नांबाबत जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षक संघ, लातूर व कोल्हापूरच्या पदाधिकाऱ्यांनी पुणे येथे शिक्षण संचालक (प्राथमिक) शरद गोसावी तसेच शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रतापसिंह यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.

यावेळी विस्तार अधिकारी पदोन्नतीसाठी माध्यमिक शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य नसल्याचे शिक्षण आयुक्तांनी आणि शिक्षण संचालक (प्राथमिक) यांनी लातूरच्या शिष्टमंडळाला सांगितले. तसेच माध्यमिक शिक्षकांच्या पदोन्नती व आंतरजिल्हा बदलीचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याबाबत शिष्टमंडळाने आपली भूमिका मांडली.

या चर्चेत जिल्हाध्यक्ष माधव गुंडरे, जिल्हा सचिव किरण पाटील, जिल्हा कोषाध्यक्ष विठ्ठल मद्देवाड, जिल्हा उपाध्यक्ष अजय रेणापूरे, जिल्हा संघटक राजेंद्र रोळे तसेच कोल्हापूर येथील मेन राजाराम हायस्कूलचे मुख्याध्यापक गजानन खाडे व बाबासाहेब माळवे उपस्थित होते.

माध्यमिक शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवर वरिष्ठ स्तरावर चर्चा झाल्याने संबंधित प्रश्नांच्या नियमसंगत व कालबद्ध निवारणाबाबत शिक्षकांमध्ये अपेक्षा निर्माण झाली आहे.

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *