जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात यावे – संकल्प प्रतिष्ठान चे अध्यक्ष अशोक सोनकांबळे यांची मागणी

जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात यावे - संकल्प प्रतिष्ठान चे अध्यक्ष अशोक सोनकांबळे यांची मागणी

अहमदपूर (गोविंद काळे) : शहरातील जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात व मैदानावर खूप मोठी मोकळी जागा आहे.या ठिकाणी कांही वर्षा पूर्वी खूप मोठ मोठे झाड होती. पण आज एकही झाड इथे राहिले नाही .हा परिसर उजाड माळरानावर झाला आहे. म्हणून शाळेचे मैदान व परिसरात वसंतराव नाईक हरीत महाराष्ट्र अभियान योजनेंतर्गत वृक्षारोपण करण्यात यावे अशी मागणी संकल्प प्रतिष्ठान चे अध्यक्ष अशोक सोनकांबळे यांनी एका निवेदनाद्वारे गट विकास अधिकारी पंचायत समिती अहमदपूर यांच्या कडे केली आहे. देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शहरातील शंभर वर्षे जूनी ही शाळ आहे. या शाळेत अनेक पिढ्या घडल्या आहेत.एकेकाळी हा परिसर झाडांनी समृध्द होता त्यामुळे शाळेच्या परिसरात पाऊल ठेवताच एका प्रसन्नता वाटत असे, आज घडीला एक झुडूप सुध्दा शिल्लक राहिले नाही.परिसर उजाड बनला आहे. विशेष म्हणजे शहराच्या मध्यवर्ती भागात असणरे हे एकमेव सार्वजनिक मैदान आहे. क्रीकेटचे सामने याच मैदानावर होतात, २६ जानेवारीला सार्वजनिक शासकीय ध्वजारोहण याच मैदानावर होते.एवढे मोठे मैदान वमोकळा परिसर शहरात कुठेच उपलब्ध नाही .
अता पर्यत शासनाच्या वृक्ष लागवडीच्या अनेक योजना राबविल्या गेल्या पण या ठिकाणी एकही झाड का लावण्यात आले नाही.हा विचार करायला लावणारा प्रश्न आहे. एवढा मोठा परिसरा कडे दुर्लक्ष होत असल्याने शाळा व परिसराला बकाल स्वरूप आले आहे. तेंव्हां संबंधितांनी या कडे त्वरीत लक्ष देऊन या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करून हा परिसर सुशोभित करावा अशी मागणी अशोक सोनकांबळे यांनी केले आहे.

About The Author