भूमिअभिलेख कार्यालयासाठी ईटीएस मशीनचे लोकार्पण..!

भूमिअभिलेख कार्यालयासाठी ईटीएस मशीनचे लोकार्पण..!

अहमदपूर (गोविंद काळे) : येथील भूमिअभिलेख कार्यालयासाठी नव्याने दाखल झालेल्या दोन ईटिएस मशीनचे लोकार्पण दि.17 जुन रोजी करण्यात आले.
या छोटे खानी कार्यक्रमासाठी येथील युवकनेते डाॅ.सिध्दार्थकुमार सूर्यवंशी यांची उपस्थिती होती. त्यांनी या दोन्ही मशीनची रितसर पूजा केली. प्रामुख्याने या ईटीएस मशीनची या कार्यालयाला गरज होती.शेतकर्‍यांचे रस्ते, जमीनी इत्यादी मोजण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मागणी आहे.त्या अनुषंगाने इतर कार्यालयाकडून मशीन घेवुन मोजनी केली जायची त्यामुळे मोजनीसाठी विलंब होत होता. आता जिल्हा नियोजन समिती मार्फत अहमदपूर कार्यालयासाठी तब्बल साधारणतः चौदा लाख रूपये किंमतीच्या मशीन्स जिल्हाअधिक्षक भूमिअभिलेख सुदाम जाधव यांच्या प्रयत्नाने उपलब्ध झाल्याने अचूक व जलद मोजणीस मदत होणार असल्याची माहिती येथील उपअधीक्षक भूमी अभिलेख आर. के. डोहाळे यांनी त्यांच्या हस्ते लोकार्पण करताना सांगीतले. या कार्यक्रमास मुख्यालय सहाय्यक डी.जी.कुलकर्णी, पर्यवेक्षक भूमापन विजय बिराजदार, अशोक शिनगारे, एस. टी. मोतीपवळे, डी. जी. तेलंगे आदीं कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.

About The Author

error: Content is protected !!