कोयत्याने वार करून पिग्मी एजंटची पैशाची बॅग लुटणाऱ्या आरोपींना मुद्देमालासह अटक.
लातूर (एल.पी.उगीले)
याबाबत थोडक्यात हकीकत अशी की, दिनांक सात ऑक्टोंबर 2023 रोजी रात्री 11:30 वाजण्याच्या सुमारास पोलीस ठाणे अहमदपूर हद्दीतील टेंभुर्णी रोडने घराकडे मोटरसायकल वरून जात असताना अज्ञात तीन आरोपींनी पाठलाग करून पिग्मी एजंट कडे पिग्मी कलेक्शन करून जमलेले रुपयांची बॅग हिस्कावण्याच्या प्रयत्न करू लागले. तेव्हा त्यांनी प्रतिकार केला असता त्याच्यावर कोयत्याने वार करून पैशाची बॅग जबरदस्तीने चोरून पळून गेले होते. त्या संदर्भाने पोलीस ठाणे अहमदपूर येथे गुन्हा नंबर 577/2022 कलम 394,34 भा द वि प्रमाणे गून्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्हा उघडकीस आणण्याकरिता पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी आदेशित केले होते. त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक सोमय मुंडे,अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी, अहमदपूर मनीष कल्याणकर यांचे मार्गदर्शनात अहमदपूर पोलीस ठाणे चे पोलीस निरीक्षक सुधाकर देडे यांचे नेतृत्वात पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अधिकारी व अमलदाराचे पथक तयार करून आरोपीच्या शोधासाठी रवाना करण्यात आले होते. फिर्यादीने सांगितलेल्या वर्णनावरून जबरी चोरी करणाऱ्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांना तपासण्यात येत होते, विविध गुन्हेगारांना ताब्यात घेऊन विचारपूस करण्यात येत होती.
दरम्यान गुन्ह्याचा तपास करीत असलेल्या पथकाला टेंभुर्णी रोडवर पिग्मी एजंटला अडवून कोयत्याने मारहाण करून लुटमार करणाऱ्या आरोपींची माहिती मिळाली. सदर माहितीची शहनिशा व विश्लेषण करून सदर पथकाने लागलीच एक पथक पुणे जिल्ह्यातील जेजुरी येथे व एक पथक अहमदपूर हद्दीत पाठवून त्या ठिकाणी सापळे लावून आरोपींना ताब्यात त्यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी त्यांचे नाव
शुभम प्रकाश जाधव, (वय 22 राहणार काळेगाव तालुका अहमदपूर),वसंत शिवाजी वाडीकर,(वय 21 राहणार अहमदपूर),जहीर इस्माईल शेख, (वय 19 राहणार लेक्चर कॉलनी, अहमदपूर.)असे असल्याचे सांगून तिघांनी सांगितले की,आम्ही पिग्मी एजंटचा नऊ वाजल्यापासून पाळत ठेवून पाठलाग करून पिग्मी एजंट यांच्यावर मिरची पुडी फेकून कोयत्याने वार करून त्यांच्याकडील पिग्मीने जमा झालेली त्याच्याकडील पैशाची बॅग जबरदस्तीने चोरून नेली होती. तसेच त्यांनी गुन्ह्यात चोरलेली रक्कम , बॅग, गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल, लोखंडी कोयता असा एकूण 65 हजार रुपयाचा मुद्देमाल काढून दिला. तो मुद्देमाल जप्त करण्यात आला असून नमूद गुन्ह्यात आरोपींना अटक करण्यात आली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सूर्यवंशी करीत आहेत.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनात अहमदपूर पोलिसांच्या पथकाने अतिशय कुशलतेने गोपनीय यंत्रणा सतर्क करून विविध सराईत गुन्हेगाराकडे तपास करून काही पुरावे उपलब्ध नसतानाही सदरचा गुन्हा उघडकीस आणून गुन्ह्यातील आरोपींना मुद्देमालासह अटक केली आहे .
सदरची कामगिरी वरिष्ठांचे मार्गदर्शनात व पोलीस निरीक्षक सुधाकर देडे यांचे नेतृत्वात तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक सूर्यवंशी,पोलीस अंमलदार तानाजी आरदवाड, ज्ञानोबा देवकते, राजकुमार डबेटवार, बापू धुळगुंडे, रुपेश कज्जेवाड, पाराजी पुठेवाड, खयूम शेख, विशाल सारोळे, बाळू मामाडगे यांनी केली आहे.