शेतकरी हा देशाचा आधारस्तंभ आहे – शिवकांत चव्हाण
उदगीर (प्रतिनिधी) : भारताचा कणा हा शेती व्यवसाय आहे. शेतकरी या देशाचा आधारस्तंभ आहे. शेतकऱ्यांनी पिकवले तरच बाजारपेठ नीट चालते. अन्यथा बाजारावर मंदीचे सावट निर्माण होते. असे उद्गार हिसोआ कंपनीच्या आर्थिक विभागाचे व्यवस्थापक शिवकांत चव्हाण यांनी काढले. येथील शिवाजी महाविद्यालयात हिसोआ इलेक्ट्रॉनिक प्रायव्हेट लिमिटेड व शिवाजी महाविद्यालय, उदगीर आणि उर्मी सामाजिक संस्था, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने सी.एस.आर. अर्थात सामाजिक बांधिलकी योजनेअंतर्गत आयोजित उदगीर परिसरातील 250 अल्पभूधारक शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक स्प्रे पंपाचे वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला होता, याप्रसंगी ते बोलत होते.या कार्यक्रमाचे अध्यक्ष किसान शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्रीरंगराव पाटील एकंबेकर होते तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे एच आर मॅनेजर पुणे येथील सोमय्या बक्षी, किसान शिक्षण प्रसारक मंडळाचे कोषाध्यक्ष नामदेव चामले, संचालक माधवराव पाटील, शिवाजीराव मुळे,पृथ्वीराज पाटील, माजी प्राचार्य विनायक जाधव हे होते, तर कार्यक्रमाला विशेष उपस्थिती पुणे येथील संदीप राजोबा, रोहित वाकले, दत्तराज सोनकुलवार, राहुल शेंडे ,प्राचार्य डॉ.अरविंद नवले, उपप्राचार्य डॉ. रामकिशन मांजरे,आयक्वेशीचे समन्वयक डॉ विष्णू पवार, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य विलास भोसले, प्रबंधक बालाजी पाटील यांची होती.
पुढे बोलताना शिवकांत म्हणाले ,हिसोआ कंपनी पुणे येथील असून या कंपनीच्या सी. एस. आर. फंडातून मागील अनेक वर्षांपासून पूरग्रस्तांना अन्नधान्य वाटप, जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप,अनाथालयातील मतिमंद मुलांसाठी थेरेपी साहित्य, चपाती मशीन, व आज शिवाजी महाविद्यालय या ठिकाणी उदगीर परिसरातील 250 अल्पभूधारक शेतकऱ्यांना इलेक्ट्रॉनिक फवारणी यंत्राचे मोफत वाटप करण्यात आले. तसेच शिवाजी महाविद्यालयाला दोन स्मार्ट बोर्ड, विद्यार्थिनीसाठी दोन इलेक्ट्रिक शँनीटरी प्याड जाळण्याची मशीन देण्यात आली. असे उपक्रम चार वर्षापासून रागविले जात आहेत आहेत. या माध्यमातून जवळपास चार वर्षात 90 लाखांची मदत करण्यात आलेली आहे. त्यादी साहित्याचे वाटप असे समाज उपयोगी कार्य केले जात आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य रामकिशन मांजरे यांनी केले यावेळी प्राचार्य अरविंद नवले यांनी मनोगतातून असे म्हटले, महाविद्यालयाने खासदार, आमदार, डॉक्टर, इंजिनियर असे विविध क्षेत्रातील विद्यार्थी घडवले. त्याचीच परिपूर्ती म्हणजे हा आजचा कार्यक्रम आहे. कारण हिसोआ कंपनीच्या आर्थिक विभागाचे व्यवस्थापक शिवकांत चव्हाण हे याच महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत. यावेळी प्रा.डॉ. शिवाजीराव मुळे, उर्मी फाउंडेशनचे आदित्य, रोहित वाकले यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमांमध्ये उदगीर तालुक्यातील 69 गावांमधील शेतकऱ्यांना 250 इलेक्ट्रॉनिक फवारणी यंत्राचे मोफत वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ व्ही के भालेराव, डॉ यु के शिरसे यांनी तर आभार अनंत पाटील यांनी मानले.