कृषि महाविद्यालय व शिवाजी महाविद्यालय यांच्या मध्ये सामंजस्य करार संपन्न
उदगीर (एल.पी.उगीले)
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी संलग्नित कृषि महाविद्यालय, डोंगरशेळकी तांडा व स्वमी रामानंद तीर्थ विद्यापीठ नांदेङ संलग्नित शिवाजी महाविद्याल,उदगीर या मध्ये विविध शैक्षणिक , वैज्ञानिक व क्रीडा उपक्रमात संयुक्त सहकार्य करण्यासाठी सामंजस्य करार दि . ११ ऑक्टोंबर २०२३ रोजी कृषि महाविद्यालय, डोंगरशेळकी तांडा येथे संपन्न झाला.
या प्रसंगी औपचारिक कार्यक्रम घेण्यातला. ङॉ.आरविंद नवले प्रभारी प्राचार्य शिवाजी महाविद्याल उदगीर यांनी या समांजस्य करारा अंतर्गत शैक्षणिक, वैज्ञानिक व क्रीडा उपक्रम राबवून दोन्ही महाविद्यालयतील विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक जडणघाने मोलाचे सहकारी होणार आहे, असे प्रतिपादन केले. ङॉ.अंगदराव सूर्यवंशी प्राचार्य कृ.मा.वि.ङो.ता.उदगीर यांनी महाविद्यालयाती कृषि विद्याशास्त्र, पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र, वनस्पती रोग शास्त्र, कृषि किटक शास्त्र व जिमखाना विभाग ईत्यादी विभागशी शिवाजी माहाविघालयातील प्रणीशास्त्र व संशोधन विभाग,जिवशास्त्र व संशोधन विभाग, आणि क्रीडा विभागशी समांजस्य करार करण्यात आले व यामध्ये सौहार्दपूर्ण सहकार्य करायचे एकमताने ठरल्याचे आपल्या भाषणातून सांगितले. या प्रसंगी शिवाजी महाविद्यालयातील ङॉ.विष्णू पवार, डॉ. यु. के.शिर्सी, ङॉ.नेहाल खान, ङाॅ.चाटे ,कृषि महाविद्यालयतील ङॉ . आशोकराव पाटील उपप्राचार्य, ङॉ. दिपक पानपट्टे, ङॉ.विजय शिंदे, ङॉ.सागर खटके, ङॉ.वसीम शेख, समस्त प्राध्यापक,कृषि महाविद्यालयातील विद्यार्थी, कार्यालयीन कर्मचारीवर्ग उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. एस. बी. पवार यांनी केले व उपस्थित मान्यवरांचे आभार ङॉ . आशोकराव पाटील यांनी व्यक्त केले.