शेतकऱ्यांचा माल उदगीर बाजार पेठेत आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे – शिवाजीराव हुडे

शेतकऱ्यांचा माल उदगीर बाजार पेठेत आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे - शिवाजीराव हुडे

उदगीर (एल.पी.उगीले) शेतकऱ्यांचा माल उदगीर बाजार पेठेत आणण्यासाठी बाजार समितीचे संचालक व सर्व आडते ,खरेदीदार सर्वांनी मिळून प्रयत्न केला पाहिजे. असे मत‌ आडत वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने आयोजित सत्कार सोहळ्याला उत्तर देताना बाजार समितीचे सभापती शिवाजीराव हुडे यांनी काढले.
आडत वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने रघकुल मंगल कार्यालयात नुतन संचालक मंडळाचा सत्कार आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असोशिसनचे अध्यक्ष श्रीधर बिरादार हे होते. या वेळी व्यापीठावर सत्कारमुर्ती सभापती शिवाजीराव हुडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शिवाजीराव मुळे,
संचालक तथा काँग्रेसचे तालुकाध्यक्ष कल्याण पाटील, ज्ञानेश्वर पाटील,
विजय निटुरे, माजी सभापती मधुकर एकुरगेकर, संतोष बिरादार, जगदीशप्रसाद बाहेती, गौतम पिंपरे, बालाजी देवकते
,जिवन पाटील, रवींद्र कोरे , बाजार समितीचे सचिव प्रदीप पाटील, असोसिएशनचे उपाध्यक्ष शिवशंकर बिरादार, साईनाथ कल्याणे, सचिव मनोहर बिरादार ई उपस्थित होते.यावेळी असोसिएशनच्या वतीने बाजार समितीच्या सभापतीसह सर्व संचालक मंडळाचा सत्कार करण्यात आला.
यावेळी कल्याण पाटील, शिवाजीराव मुळे, ज्ञानेश्वर पाटील, मधुकर एकुरगेकर , विजय निटुरे, सदस्य प्रमोद पाटील यांनीआपले विचार व्यक्त केले.
पुढे बोलताना हुडे म्हणाले की,हा सत्कार माझा नसुन शेतकरी मतदारांच्या व पक्षश्रेष्ठींचा आहे. शेतकऱ्यांचा हितासाठी व्यापारी ना सोबत घेऊन काम करीन.
आपण सर्वजण मिळून आपल्या समोर चागला चांगल्या दृष्टीकोन ठेवून आपण सर्व मिळून काम करू असे ते म्हणाले.
यावेळी राजेश अबंरखाने, सुदर्शन मुंडे, शिवकुमार गुळंगे,सागर महाजन, माधवराव कल्याणे, बाबुराव पांढरे, मलिकर्जून लंजवाडकर, लक्ष्मीकांत चिकटवार, शांतीवीर मुळे, सतीश बिरादार, आप्पासाहेब पाटील, गुरुनाथ बिरादार, बालाजी बिरादार, मलीकार्जून काळगापुरे,यांच्यासह आडत व्यापारी, खरेदीदार, दालमिल असोशिसनचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक असोशिसनचे अध्यक्ष श्रीधर बिरादार, सूत्रसंचालन सहसचिव नागेश आंबेगावे यांनी तर आभार शिवाजी पेठे यांनी मांडले.सदरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी असोसिएशनचे अध्यक्ष श्रीधर बिरादार, उपाध्यक्ष शिवशंकर बिरादार, साईनाथ कल्याणे, सचिव मनोहर बिरादार, सहसचिव नागेश आंबेगावे, कोषाध्यक्ष चंद्रकांत बिरादार, सहकोषाधयक्ष भरत दंडीमे, यांच्यासह सदस्य सुनील पाटील, उमाकांत पांढरे, दिलीप जाधव, श्याम बिरादार, मारोतीराव कडेवार, शिवाजी पेठे, अरविंद जिरगे, मलीकार्जून रेगुडे, निलेश कुमार कालाणी, प्रमोद पाटील, संजय बिरादार, दत्तात्रय जगळपुरे, कमलाकर भंडे, चंद्रकांत बिरादार ई केले आहे.

About The Author