पिवळा मोझॅक रोगामुळे सोयाबीनचे नुकसान, तात्काळ पंचनामे करून पिक विमा व अनुदान देण्याची शिवसेनेची मागणी
अहमदपुर (गोविंद काळे) : तालुक्यातील सोयाबीन पिकावर पिवळ्या मोझॅक रोगाच्या प्रादुर्भावामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पिकविमा व अनुदान देण्यात यावे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी यांनी येथील तालुका कृषी अधिकारी सचिन बावगे यांना निवेदन देऊन मागणी केली आहे. लातुर जिल्ह्यातील अहमदपुर – चाकुर तालुक्यातील शेतकऱ्यांनी दरवर्षी प्रमाणे याही वर्षी सोयाबीन पिकाची सर्वाधिक पेर केली आहे. सोयाबीन पिक हे लातुर जिल्यात सर्वाधिक घेतले जाते, देशात सोयाबीन पिक घेणारा लातुर जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर आहे. सध्या परस्थितीत सोयाबीन पिकावर पिवळा मोझॅक रोग पडला असुन शेती मधील सोयाबीन पिवळ पडून शेंगा सहित जागेवर वाळून जात आहे. अनेक शेतकरी पिक विमा कंपनीच्या ॲपवर तक्रार नोंद करत आहेत. सर्वाधिक शेतकऱ्याकडे मोबाईल नाहीत त्यामुळे कृषी विभाग व विमा कंपनी मार्फत पंचनामा करून सरसकट विमा व शासनाच्या वतीने सोयाबीन अनुदान मिळवून देण्यात यावे अन्यथा आपल्या कार्यालया समोर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या निवेदनावर उपतालुका प्रमुख अनिकेत फुलारी, कार्यालय प्रमुख सुभाष गुंडीले, सोशल मीडिया तालुका प्रमुख ओम गुंडरे, युवा सेना तालुका सरचिटणीस अजय सुरनर, खंडाळीचे चेअरमन व्यंकट पाटील यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.