लोकसभा निवडणूकीत भाजपला धडा शिकवा – शिवसेना जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी
अहमदपुर (गोविंद काळे) : तालुक्यातील अंधोरी येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने ‘होऊ द्या चर्चा’ कार्यक्रमा अंतर्गत सभेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विश्वांभर (तात्या) स्वामी होते तर व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी उपजिल्हाप्रमुख भारत सांगवीकर, उपतालुका प्रमुख अनिकेत फुलारी, सहसचिव पद्माकर पेंढारकर यांची उपस्थिती होती. यावेळी बोलताना जिल्हा प्रमुख म्हणाले की, लोकसभेच्या 2014, 2019 च्या जाहीरनाम्यात आश्वासनांची खैरात वाटण्यात आली होती , किती आश्वासनांची पूर्तता केंद्र सरकारने केली आहे, याचा जाब मतदारांनी लोकसभा निवडणुकीत भाजपला विचारायला हवा. वर्षाला दोन कोटी नौकऱ्या दिल्या का? महागाई कमी झाली का? बुलेट ट्रेन धावली का? गंगा स्वच्छ झाली का ? शेतकर्यांचे प्रश्ण सुटले का ? या सरकारने ,लाल किल्ला विकला, रेल्वे स्टेशन विकले, विमानतळ विकले, कोळशाच्या खाणी विकल्या, महाराष्ट्र सरकारने हजारो जिल्हा परिषद शाळा विकल्या आणि हजारो दारुचे दुकाने सुरू करण्याचा निर्णय घेतला, सर्व शासकीय रुग्णालयाचे खाजगीकरण होणार आहे. नौकऱ्यात खाजगीकरण होणार आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, महानगर पालिका निवडणुका 2023 घेतल्या जात नाहीत लोकसभा निवडणुकीत पुन्हा नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले तर देशात कधीच निवडणूका होणार नाहीत, हुकुमशाह प्रमाणे देशाचा कारभार चालेल, लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर मोदींना रोखण्यासाठी येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजपला धडा शिकवा अशी जिल्हा प्रमुख यांनी जळजळीत टीका करत आवाहन केले. उपजिल्हाप्रमुख भारत सांगवीकर, उपतालुका प्रमुख अनिकेत फुलारी यांचीही भाषणे झाली.
यावेळी गंगाधरराव कल्याणे सर, बापुराव देऊळकर, ओम गुंडरे, विजय ढाकणे, मारोती बिराडे,विठ्ठल मंगे, सोपान कोंडमगिरे,शंकर मलिले, बालासाहेब मंगे, रोहित क्षीरसागर सर, दत्ता कदम, कोडीराम गुंटे, सद्दाम पठाण, गणेश माने, रमाकांत स्वामी, अंगद धडेवाड, विक्रम गायकवाड, भालचंद्र कावळे ,शिवाजी वाघंब्रे,त्रिमुख बने, सुधाकर क्षिरसागर, नागनाथ हाळकर, यांच्यासह शिवसैनिक, गावातील नागरिक व महिलांची उपस्थिती होती.