यश मिळवण्यासाठी वेळेचे नियोजन महत्त्वाचे – पीएसआय स्नेहा गुंडरे

यश मिळवण्यासाठी वेळेचे नियोजन महत्त्वाचे - पीएसआय स्नेहा गुंडरे

अहमदपूर (गोविंद काळे) : नूतन पी एस आय स्नेहा गुंडरे यांनी ज्ञानदिप अकाडमी येथे मार्गदर्शन करताना सांगितले की मी येथीलच मरशिवणीची राहणारी आहे. लातूर ला तयारी केली आणि पाहिल्याचा प्रयत्नामध्ये यशस्वी झाले. अभ्यास हा प्रत्येक जण करतो, पण यशस्वी तोच होतो जो वेळेचं नियोजन करतो. अभ्यास करण्याच्या प्रतेकाच्या वेगवेगळ्या सवई असतात, प्रतेकची क्षमता वेगळी असते आपल्या क्षमतेने जेवढी जास्त मेहनत करता येईल तेवढे मेहनत करा यश नक्कीच मिळेल. ज्ञानदीप अकॅडमी ही खूप चांगली अकॅडमी आहे खूप दिवसापासून ऐकून आहे आज प्रत्येक्षात पाहण्याचा योग आला. मुली साठी घराच्या बाहेर निघाल्यावर सर्वात महत्वाची असते सुरक्षा आणि ज्ञानदीप अकॅडमी मध्ये मुली या खूप सुरक्षित आहेत. तुम्ही येथे टिकून रहा सातत्य ठेवा यश नक्कीच मिळेल. यावेळी अकॅडमी च्या वतीने स्नेहा गुंडरे चा सत्कार करण्यात आला. अध्यक्षीय समारोपात उद्धव इप्पर म्हणाले की आपण अकॅडमी मध्ये पोलीस किंवा आर्मी मध्ये जाण्यासाठी आला आहेत ते तर तुम्ही होणारच आहेत पण जर सातत्याने मेहनत केलात तर अधिकारी पण होऊ शकतो. जिद्द आणि चिकाटी महत्वाची आहे. स्नेहा ताई सारख्या अनेक विद्यार्थी आहेत ज्यांच्या मध्ये कुवत आहे पण मार्गदर्शन अभावी यशस्वी होत नाहीत. म्हणून मार्गदर्शन पण महत्वाचे आहे. स्नेहा ना खूप खूप शुभेच्छा आपण लवकर प्रशिक्षण पूर्ण करून जनते साठी कार्य करावे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन गुट्टे तर आभार चिमणराव कावळे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राम मेजर, जितेंद्र मेजर, महिला प्रशिक्षक अर्चाना करपे, संदीप नरोटे, कपिल डोमे यांनी केले.

About The Author