महात्मा फुले महाविद्यालयास डॉ. करजगी यांची सदिच्छा भेट
अहमदपूर (गोविंद काळे) : येथील महात्मा फुले महाविद्यालयास स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड च्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाची संचालक डॉ. मलिकार्जुन करजगी यांनी सदिच्छा भेट देऊन विविध विभागाची पाहणी केली. याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. मल्लिकार्जुन करजगी यांनी महात्मा फुले महाविद्यालय स सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या कुशल नेतृत्वाखाली महात्मा फुले महाविद्यालय गुणवतेसह सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा अशा विविध क्षेत्रांमध्ये नाविन्यपूर्ण कामगिरी करीत असल्याचे व महाविद्यालयाने केलेल्या पर्यावरण संवर्धनाच्या कार्याचे कौतुक केले. तसेच, राष्ट्रीय सेवा योजना विभाग व इतर विभागांना भेटी दिल्या. त्याचबरोबर राष्ट्रीय सेवा योजना विभागाने विकसित केलेल्या ‘राजमाता जिजाऊ उद्यान ‘ तसेच ‘राजे शहाजीराजे भोसले आनंद घनवन मियावाकी’ प्रकल्पास त्यांनी आवर्जून भेट दिली. यावेळी प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांनी त्यांचा यथोचित सन्मान केला. यावेळी उपप्राचार्य डॉ.दुर्गादास चौधरी, कार्यक्रमाधिकारी डॉ. पांडुरंग चिलगर, सहाय्यक कार्यक्रमाधिकारी डॉ. सतीश ससाणे, प्रोफेसर डॉ. अनिल मुंढे, डॉ. मारोती कसाब, क्रीडा संचालक प्रोफेसर डॉ. अभिजीत मोरे यांच्यासह मास्टर दीनानाथ मंगेशकर महाविद्यालय औराद शहाजानीचे डॉ. विजय पवार तसेच ; स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील प्रा. डॉ.गोविंद सूर्यवंशी आदी उपस्थित होते.