यशवंत विद्यालयाला लातूरच्या स्वामी विवेकानंद विद्यालयाची अभ्यास भेट

यशवंत विद्यालयाला लातूरच्या स्वामी विवेकानंद विद्यालयाची अभ्यास भेट

अहमदपूर (गोविंद काळे) : शिक्षण क्षेत्रात अग्रेसर असलेल्या यशवंत विद्यालयाची शालांत प्रमाण परीक्षेतील नेत्र दीपक भरारी आणि इतर शैक्षणिक यशवंत पॅटर्न पाहण्यासाठी लातूरहून श्री स्वामी विवेकानंद विद्यालय आणि स्वामी विवेकानंद विद्यालयाच्या मुख्याध्यापका सह टीमने भेट देऊन चिकित्सकपणे पाहणी केली. यावेळी त्याने शालांत प्रमाणपत्र परीक्षेत शंभर टक्के गुण घेणाऱ्या 18 विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले. शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल, एन एम एन एस परीक्षा, एम टी एस परीक्षा, एन टी एस परीक्षा सह विविध स्पर्धा परीक्षेत उत्तुंग यश कसे मिळविले याबद्दल सर्व विभागाकडून विशेष माहिती घेतली. टिम ने दहावीच्या वर्गावर जाऊन त्यांनी पाहणी केली. शालेय परिपाठ, बोधकथा, बातमीपत्र यांच्यासह दहावीच्या वर्गाला शिकवणाऱ्या सर्व विषयाच्या शिक्षकांनी आपापल्या विषयाविषयी विशेष टिप्स देऊन मार्गदर्शन केले. या शिष्टमंडळात वार्षिक प्रमुख सरदार देशमुख, उपमुख्याध्यापक अनिल सोमवंशी, उपमुख्याध्यापक प्रभाकर सावंत, सहशिक्षक अब्दुल गलीब, भागवत ढोक, अरुण काळे, राजकुमार खांडके, व्यंकट कांबळे, दिलीप मानकरी, नीलिमा कांबळे सह पंधरा शिक्षकांचा अभ्यास गटात समावेश होता. प्रारंभी उपस्थित अभ्यास गटातील मान्यवरांचा प्राचार्य गजानन शिंदे यांच्या हस्ते शाल, ग्रंथ आणि पुष्पहार देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर व्ही पाटील आणि के डी बिराजदार यांनी तर आभार पर्यवेक्षक राम तत्तापूरे यांनी मानले. या समयी मुख्य उपमुख्याध्यापक राजकुमार घोटे, पर्यवेक्षक अशोक पेद्येवाढ, सहशिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

About The Author