मुस्लिम समाजाच्या आरक्षणासाठी अहमदपूरात उपोषण
अहमदपूर (गोविंद काळे) : मुस्लिम आरक्षण शिक्षण संरक्षण साठी बेमुदत धरणे व साखळी उपोषण सुरू असून उपोषणाचा तिसरा दिवस आहे. मुस्लिम समाजाची परिस्थिती अतिशय हलाखीची असून मुस्लिम समाजाला आरक्षणासह शिक्षण व संरक्षण अतिशय गरजेची असून कोर्टाने मुस्लिम समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात आदेश देऊनही राज्य सरकार मुस्लिम समाजाला आरक्षण देत नाही म्हणून राज्य सरकारच्या विरोधात 12 ऑक्टोबर पासून तहसील कार्यालय समोर बेमुदत धरणे व साखळी उपोषण सामाजिक कार्यकर्ते जिलानी मणियार व गौस शेख यांनी चालू झाले आहे.जोपर्यंत मुस्लिम समाजाला पाच टक्के आरक्षण राज्य सरकार जाहीर करीत नाही तोपर्यंत हे धरणे व साखळी उपोषण चालू राहणार असल्याचे निवेदनात सांगितले आहे. यासंदर्भात तहसील कार्यालयातून उपोषणकर्त्याच्या मागण्या वरिष्ठ कार्यालयात कळविण्यात आल्या असून उपोषण मागे घ्यावे या संदर्भातील पत्र देण्यात आले आहे तरीही उपोषण कर्ते आपल्या मागणीवर ठाम असून राज्य सरकार जोपर्यंत आरक्षण जाहीर करणार नाही तोपर्यंत ही साखळी उपोषण चालूच राहणार असल्याचे उपोषणकर्त्यांनी सांगितले आहे.