महसुली पुरावे जमा करण्याचे आवाहन

महसुली पुरावे जमा करण्याचे आवाहन

अहमदपूर (गोविंद काळे) : येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आरक्षण योद्धा श्री मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ दि. 13 सप्टेंबर पासून सुरू असलेल्या साखळी उपोषणाचा 37 वा दिवस असून आजच्या दिवशी मौजे काजळ हिप्परगा, लेंडेगाव, विळेगाव येथील समाज बांधव साखळी उपोषणास बसले आहेत. गेल्या 36 दिवसांपासून येथे साखळी उपोषण सुरू असून अंतरवली सराठी नंतर सर्वात प्रभावी व नियोजनबद्ध उपोषण या ठिकाणी सुरू आहे यासाठी समनव्यय समितीच्या वतीने तालुक्यातील प्रत्येक समाज बांधवाला या लढ्यात सहभागी होता येईल या दृष्टीने नियोजन केले असून या उपोषणात सहभागी होण्यासाठी गावोगावी जाऊन समाज बांधवांचे प्रबोधन केले जात आहे यासाठी अभ्यासू वक्ते ,आरक्षण कसे भेटेल याबाबत सविस्तर मार्गदर्शन करून उपोषणामध्ये सहभागी होण्याचे अपील करत आहेत आत्तापर्यंत 76 गावांचा समावेश या उपोषणामध्ये झाला असून दि 23 तारखेपर्यंत हे उपोषण चालणार आहे त्यानंतर श्री मनोज जरांगे पाटील ठरवतील तशी भूमिका घेतली जाणार आहे.
दि. 21 तारखेला महाराष्ट्र शासनाने मराठा आरक्षण संदर्भात नेमलेली शिंदे समिती महसुली पुरावे गोळा करण्यासंदर्भात लातूर येथे येणार असून अहमदपूर तालुक्यातील सर्व समाज बांधवांना आवाहन करण्यात येते की आपल्याकडे असलेले निजामकालीन महसुली पुरावे कुणबी मराठा जातीच्या नोंदी इत्यादी आवश्यक कागदपत्रे समन्वय समितीकडे जमा करावित यासाठी श्री नाना (भिमराव)कदम,श्री सिद्धार्थ दापके,श्री धीरज भंडे पाटील ,श्री तानाजी मोरे,श्री शैलेश जाधव,श्री श्रीधर तरटे, श्री शिवानंद भोसले, श्री परमेश्वर सूर्यवंशी, यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन सकल मराठा समाज समनव्यय समिती अहमदपूर तालुका यांच्या वतीने करण्यात आले आहे.

About The Author