व्यक्तिमत्त्वाच्या सर्वांगीण विकासासाठी एनसीसी महत्त्वाची कर्नल हेमंत जोशी यांचे प्रतिपादन
अहमदपूर (गोविंद काळे) : भारतीय प्रशासनामध्ये आणि राजकारणामध्ये व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी एनसीसीच्या माध्यमातून आदर्शवत जीवन घडते असे आग्रही प्रतिपादन यांनी केले. ते दि. सोळा रोजी यशवंत विद्यालयात फिफ्टी थ्री बटालियन एनसीसीच्या विद्यार्थ्यांना प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य गजानन शिंदे,उपमुख्याध्यापक राजकुमार घोटे, पर्यवेक्षक अशोक पेदेवाड, राम तत्तापुरे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी त्यांनी संवाद सांधून एन सी सी मुलांनी शिस्त आणि अनुशासन पाळावे असे जाहीर आवाहन केले. प्रास्ताविक राम तत्तापुरे यांनी सूत्रसंचालन एन सी सी ऑफिसर अशोक पेदेवाड यांनी तर आभार गौरव चवंडा यांनी मानले. या समयी मेजर एस एम सुभेदार यांच्यासह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.