नवरात्रात संत ज्ञानेश्वर विद्यालयात नवदुर्गांचा सन्मान
अहमदपूर (गोविंद काळे) : सर्व सणामधील महत्वाचा सण म्हणजे दसरा. नवरात्राची सुरुवात झाली असल्याने सर्वत्र कार्यक्रम सुरू आहेत. त्याचाच भाग म्हणून संत ज्ञानेश्वर विद्यालय अहमदपूरच्या वतीने नऊ दिवस नऊ महिलांचा सत्कार नवदुर्गा स्वरूपात करण्यात येत आहे. ज्या महिला समाजात वैशिष्ट पूर्ण कार्य करतात अशांचा हा सन्मान. सौ. लिला सुरेश डबीर या संघर्षशिल महिलेचा विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मीना तोवर व मुख्याध्यापिका आशा रोडगे यांचे हस्ते सन्मान करण्यात आला. शालेय प्रार्थेनेच्या वेळी झालेल्या भावस्पर्शी सत्काराच्या वेळी लिला डबीर यांनी सांगितले कमी शिक्षण व कुटुंबाची कमकुवत आर्थिक परिस्थिती होती पण मुलांचे शिक्षण या ध्येया मुळे घरगुती व्यवसाय करत 25 वर्ष संघर्ष करत मुलांच्या शिक्षणा सोबत वयाच्या 54 व्या वर्षी मी स्वतः एम ए पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. संत ज्ञानेश्वर विद्यालयाच्या संस्था सचिव प्राचार्या रेखा तरडे – हाके यांनी शैक्षणिक, सामाजिक व राजकीय क्षेत्रात केलेले कार्य हे प्रेरणा देणारे आहे. विद्यार्थ्यांनी आपले शिक्षण कोणत्याही परिस्थिती मधे अर्धवट सोडू नये कारण शिक्षणाने आयुष्याची दिशा ठरते . आपण खूप शिकलो म्हणून श्रमाला कमी न लेखण्याचा सल्ला ही लिला डबीर यांनी या वेळी दिला. प्रास्ताविक आशा रोडगे यांनी केले. सूत्रसंचलन संगीता आबंदे यांनी तर आभार मीना तोवर यांनी मानले. त्रिगुणा मोरगे यांच्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.