विश्व हिंद परीषद व बजरंग दलच्यावतीने उदगीरमध्ये श्री छत्रपती शिवाजी महाराज शौर्य जागरण यात्रा उत्साहात संपन्न

विश्व हिंद परीषद व बजरंग दलच्यावतीने उदगीरमध्ये श्री छत्रपती शिवाजी महाराज शौर्य जागरण यात्रा उत्साहात संपन्न

उदगीर (प्रतिनिधी) : सकल हिंदू समाजाच्या सहभागाने देवगिरी प्रांतामध्ये भव्य शौर्य जागरण यात्रेचे आयोजन करण्यात आलेले होते . विश्व हिंदू परीषदेच्या स्थापनेला श्रीकृष्ण जन्माष्टमी २०२४ ला ६० वर्षे पूर्ण होत असल्याने हे वर्ष विश्व परिषदेचे षष्टिपूर्ती वर्षे आहे. यानिमित्ताने वर्षभर देशभरात विश्व हिंदू परीषदेने आपल्या सर्व कार्यविभागाच्या सहभागाने विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या षष्ठीपूर्ती वर्षानिमीत्ताने विश्व हिंदू परिषदेचा युवा संगठन कार्यविभाग बजरंग दलाने पूर्ण देशभरात हिंदू समाजात शौर्य संस्काराचे व्यापक जनजागरण व्हावे, तसेच हिंदू साम्राज्य निर्माते छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी साम्राज्याला यावर्षी ३५० वर्षे पूर्ण होत आहेत. हिंदू पदपातशाही रूपाने नवीन सृष्टी जागरण कार्यातील महाराजांच्या योगदानाबद्दल समाजातील महाराजांविषयीचा कृतज्ञतेचा भाव वृध्दिंगत व्हावा, यासाठी विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या पुढाकाराने उदगीर तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराज शौर्य जागरण यात्रा काढण्यात आली.
या यात्रेची सुरुवात उदगीर तालुक्यातील कुमठा येथे सकाळी १०.०० सरपंच सुनिल केंद्रे यांच्या हस्ते आरती करण्यात आली. यावेळी भागवत केंद्रे व पदाधिकारी उपस्थित होते . तोंडार येथे प्रांतधर्म प्रसार प्रशांसनिक प्रमुख विलास खिंडे व लोणी येथे पांडूरग फड यांनी स्वागत व आरती केली . उदगीर शहराची सुरुवात उदयगिरी कॉलेज,सोमनाथपूर येथे अमोल भालेराव यांच्या हस्ते छ. शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचं पूजन करून, पुष्पहार घालून आरतीने शुभारंभ करण्यात आले . यावेळी भाजपा उदगीर तालुकाध्यक्ष शिवशंकर धुप्पे, चिटणीस संदिप कुलकर्णी, राम जाधव, गणराज जाधव हे उपस्थित होते. यानंतर ही शौर्य यात्रा नांदेड नाका येथील जिवाजी महाले चौक, साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे चौक, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथील महापुरुषांना पुष्पहार अर्पण करण्यात आले .
श्रीलक्ष्मी नारायण मंदिर येथे भाजपा शहराध्यक्ष मनोज पुदाले व माजी न.प.सदस्य ॲड. दत्ताजी पाटील यांच्या हस्ते आरती करून सुरुवात करण्यात आली. सराफ लाईनमार्गे शंकरअप्पा मठ येथे स्वागत, आरती व पुष्पवृष्टी करून पाऊले खेळण्यात आली. यानंतर चौबारा मार्गे शहर पोलिस ठाणे ते नगर परीषद येथे बसवेश्वर महाराजांना पुष्पहार घालून वारकरी संप्रदायच्या वतीने पाऊले खेळण्यात आली. अशोक नगर मार्गे श्रीराम मंदिर येथे संघ प्रचारक प्रमोद देशपांडे व मठ मंदिर प्रांत प्रमुख अजय दंडवते यांच्या हस्ते आरती करून शहिद कॉप्टन कृष्णकांत चौक येथे पुष्पहार अर्पण करण्यात आले .
देगलूर रोड मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे स्वागत करून पुष्पवृष्टी व आरती करण्यात आली. यावेळी अभिजीत पाटील यांच्या हस्ते शिव मानवंदना देण्यात आली, याप्रसंगी श्रीराम प्रतिष्ठाणचे अध्यक्ष सतिश पाटील, अमोल निडवदे आदी उपस्थित होते . यानंतर दुधिया हनुमान मंदिर येथे हनुमानाची आरती करून ट्रस्टि ओम विश्वनाथे यांच्या वतीने सर्वांना आल्पोपहार देण्यात आला व शौर्य जागरण यात्रेचा समारोप करण्यात आला .
या शौर्य जागरण यात्रेमध्ये शेल्हाळ रोड, उदगीर येथील श्री संत कबीर वारकरी शिक्षण संस्था व संभाजी महाराज यांच्या वारकरी शिक्षण संस्था माळीहिप्परगा, ता. जळकोट येथील विद्यार्थी वारकरी वेशभूषेत टाळ, मृदंगाच्या गरजात सहभागी झाले होते . या यात्रेसाठी पोलिस प्रशासनाच्या वतीने उदगीरचे उपविभीय पोलिस अधिकारी भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली उदगीर शहरचे पो.नि. परमेश्वर कदम, ग्रामाणचे पो.नि. संभाजी पवार यांनी चोख बंदोबस्त लावला होता.
ही शौर्य जागरण यात्रा विश्व हिंदू परिषदेचे देवगिरी प्रांत शालेय शिक्षण नितीमुल्य प्रमुख संतोष कुलकर्णी व मठ मंदिर प्रांत प्रमुख अजय दंडवते यांच्या मार्गदर्शनाखाली शहर अध्यक्ष महादेव घोणे, शहर मंत्री श्रीपाद करंजीकर, यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाली. या शौर्य जागरण यात्रेसाठी लातूर जिल्हा समरसता प्रमुख विश्वनाथ गायकवाड, जिल्हा सहमंत्री सचिन जळकोटे, प्रांतधर्म प्रसार प्रशांसनिक प्रमुख विलास खिंडे, मठ मंदिर विभाग प्रमुख ह.भ.प. उद्धव महाराज हैबतपुरे, संघ ता. कार्यवाह डॉ.राजुरकर, प. पु. विजयाराजे कल्यानकर महाराज महानुभाव पंथ सुखदेव स्वामी, परमानंद निलंगे सहमंत्री श्रीपाद महामुणी, आनंद महामुणी, विश्व हिंदू परिषद ग्रामीण मंत्री, सेवा प्रमुख दिनेश देशमुख, सावन टंकसाळे, प्रशात काळेगोरे, विष्णू कुलकर्णी रोहित बोईनवाड, ला .बः शा . विद्यालयाचे केंद्रे सर, विष्णू मंहिद्रकर, शुभम लोणीकर, चैतन्य बोईनवाड, श्रीवास्तव,विष्णू लोणीकर, संदिप रोडगे, माधव रोडगे,माधव शिंदे यांनी परिश्रम घेतले .

About The Author