चोरीस गेलेल्या कारसह 3 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत, स्थानिक गुन्हे शाखेची 24 तासात कारवाई! मुद्देमाल व आरोपी अटक

चोरीस गेलेल्या कारसह 3 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत, स्थानिक गुन्हे शाखेची 24 तासात कारवाई! मुद्देमाल व आरोपी अटक

लातूर (एल. पी.उगीले) : लातूर जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या धडाकेबाज मोहिमेचा आणखी एक उत्कृष्ट तपासाचा आदर्श समोर आला आहे तीन लाखांचा मुद्देमाल हस्तगत करून अवघ्या 24 तासात आरोपीला अटक केली आहे. या बाबत थोडक्यात हकीकत अशी की,दिनांक 13/10/2023 पोलीस ठाणे एमआयडीसी येथे गुन्ह्यातील फिर्यादीने त्याच्या मालकीची फियाट कंपनीची कार मध्यरात्री कोणीतरी अज्ञात चोरट्याने लातूर ते बार्शी जाणारे रोड वरून चोरून नेली आहे, वगैरे फिर्याद दिली. त्यावरून पोलीस ठाणे एमआयडीसी येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 758/2023 कलम 379 भादवि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हा उघडकीस आणने कामी पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे, याचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांचे नेतृत्वात गुन्ह्यातील अरोपीच्या शोधकामी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तयार करण्यात आले.

सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास करीत असताना पथकास गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, लातूर ते बार्शी जाणारे रोडवरुन चोरीस गेलेली कार पुणे येथील फुरसुंगी ते हडपसर जाणारे रोडवर असून एक इसम विकण्याचा प्रयत्न करीत आहे. अशी माहिती मिळताच सदर पथक फुरसुंगी येथे पोहोचून पाहणी केली असता, गुन्ह्यात चोरीस गेलेली कार तीच असल्याचे निष्पन्न झाले. पथकाने त्या ठिकाणी सापळा लावला. थोड्याच वेळात त्या कार मध्ये बसताना पथकाने एकास ताब्यात घेतले व त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याने त्याचे नाव अरविंद बालाजी डावखरे, (वय 21 वर्ष, राहणार खुटवड चौक, फुरसुंगी तालुका हवेली, जिल्हा पुणे.)असे असल्याचे सांगून 11/10/23 रोजी मध्यरात्री लातूर ते बार्शी जाणारे रोडवर पार्क केलेली कार चोरी केल्याचे सांगितले . त्यावरून आरोपी बालाजी डावखरे याला ताब्यात घेऊन त्याच्या ताब्यातील चोरीची कार जप्त करण्यात आली असून पुढील कार्यवाही करिता आरोपी व कार पोलीस ठाणे एमआयडीसी च्या ताब्यात देण्यात आलेली आहे तपास पथकातील पोलीस अधिकारी, अंमलदार यांनी गुन्हा उघडकीस आणण्याच्या अनुषंगाने मिळालेल्या माहितीचा बारकाईने अभ्यास व विश्लेषण करून गुन्हा उघडकिस आणून गुन्ह्यात चोरलेला मुद्देमाल 24 तासात हस्तगत केला आहे.
सदरची कामगिरी वरिष्ठांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांचे नेतृत्वात पोलीस अमलदार राहुल सोनकांबळे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, मनोज खोसे, राम गवारे , शिंदे , चालक पोलिस अमलदार कुंभार, सायबर सेल चे पोलीस अमलदार गणेश साठे, शैलेश सुडे यांनी केली आहे.

About The Author