विद्यार्थ्यांनी विवेक जागृत ठेवून कार्य करावे – नंदनी जाधव

विद्यार्थ्यांनी विवेक जागृत ठेवून कार्य करावे - नंदनी जाधव

अहमदपूर (गोविंद काळे) : आज उच्च शिक्षण घेणारा माणूसही भोंदू बाबाच्या नादी लागल्याचे सांगून शालेय आणि महाविद्यालयीन स्तरावर आदर्श व संस्कार क्षम पिढी तयार करण्यासाठी विद्यार्थ्यांनी विवेक जागृत ठेवून चिंतन, मनन करून अभ्यास करावे असे आग्रही प्रतिपादन अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या जनसंवाद यात्रेच्या प्रमुख नंदिनी जाधव यांनी. ते दि. वीस रोजी यशवंत विद्यालयाच्या सभागृहामध्ये जादूटोणाविरोधी कायदा, जनसंवाद प्रबोधन यात्रेत विद्यार्थ्यांशी मार्गदर्शन प्रसंगी बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एस एस एम प्रतिष्ठानच्या सचिव प्राध्यापक डॉक्टर सुनिता ताई चवळे लोहारे होत्या. यावेळी व्यासपीठावर प्राचार्य गजानन शिंदे, भगवान रणदिवे, अनिस चे अध्यक्ष डॉक्टर धीरज देशमुख, प्रधान सचिव मेघराज गायकवाड, प्राध्यापक एम बी पठाण, पंकज जयस्वाल, राजकुमार गोटे, राम तत्तापुरे, अशोक पेदेवाड ,चंद्रशेखर भालेराव यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी पुढे बोलताना नंदिनी जाधव म्हणाल्या की मनुष्य नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट प्रथा व जादूटोणा प्रतिबंध व उच्चाटन कायद्याचे सर्वांनी पालन करावे असे जाहीर आवाहन केले. या कार्यक्रमाचा अध्यक्ष समारोप प्राध्यापक डॉक्टर सुनिता ताई चवळे लोहारे यांच्या भाषणाने झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर्यवेक्षक राम तत्तापुरे यांनी सूत्रसंचालन राजकुमार पाटील, के डी बिराजदार यांनी तर आभार माधव मूकनर यांनी मानले. अहमदपुरात अनिस जनसंवाद यात्रेचा शुभारंभ माजी मंत्री बाळासाहेब जाधव यांनी हिरवा झेंडा दाखवून केला. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी मनीष कल्याणकर, जनसंवाद यात्रेच्या प्रमुख नंदनी जाधव, भगवान रणदिवे, माजी नगरसेवक शेषेराव ससाने, चंद्रशेखर भालेराव, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अझर बागवान, पूजाताई गायकवाड,नाझीम शेख, अहमद तांबोळी यांच्या सह मान्यवरांचची उपस्थितीहोती. सदरची जनसंवाद यात्रा महात्मा गांधी महाविद्यालय, यशवंत विद्यालय, किलबिल नॅशनल स्कूल ,क्राइस्ट इंटरनॅशनल स्कूल येथे संपन्न झाली.

About The Author