अण्णाभाऊ साठे सभागृहाचा लोकार्पण सोहळा संपन्न

अण्णाभाऊ साठे सभागृहाचा लोकार्पण सोहळा संपन्न

उदगीर (एल.पी.उगीले) : लोकशाहीर आण्णाभाऊ साठे नागरी अनुसूचीत जाती व नवबौध्द वस्ती सुधार योजना २०२१-२२ अंतर्गंत म्हाडा येथे डाॅ.बाबासाहेब आंबेडकर सभागृह बांधकाम व सिमेंट रस्ता व संजयनगर येथे साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे सभागृहाचे बांधकाम करुन त्याचे लोकार्पण केले असून या सभागृहाचा उपयोग समाजबांधवांच्या सेवेत आजपासुन येणार आहे. दलितवस्ती मधून शहरात अनेक सभागृह मंजूर केले आहेत, सद्य स्थितीत ती कामे पुर्णात्वाकडे जात आहेत. त्याचेही लोकार्पण आपण लवकरच करणार असुन जनतेला नागरी सुविधा पुरविण्यासाठी मी सदैव तत्पर आहे. येत्या काळात साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांचा पुर्णाकृती पुतळा उभारणार असुन त्यासाठी आपण ४० लक्ष रुपयाचा निधी मंजूर केला आहे. पुतळ्याच्या बाजूलाच महाराष्ट्रातील एकमेव असे साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांचे स्मारक उभारणार असल्याची ग्वाही क्रीडा व युवक कल्याण, बंदरे मंत्री संजय बनसोडे यांनी दिली. ते संजयनगर व म्हाडा काॅलनीतील लोकशाहीर आण्णाभाऊ साठे नागरी अनुसूचीत जाती व नवबौध्द वस्ती सुधार योजना २०२१-२२ अंतर्गंत डाॅ.बाबासाहेब आंबेडकर सभागृह व आण्णाभाऊ साठे सभागृह व सिमेंट रस्त्याच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी ना.बनसोडे बोलत होते.

यावेळी माजी सभापती सिद्धेश्वर पाटील, माजी उपनगराध्यक्ष फैजुखाँ पठाण, शहराध्यक्ष समीर शेख, उपजिल्हाधिकारी सुशांत शिंदे, तहसीलदार रामेश्वर गोरे, मुख्याधिकारी शुभम क्यातमवार, माजी नगरसेवक श्रीरंग कांबळे, माजी नगरसेवक मनोज कपाळे, माजी उपसभापती बाळासाहेब मरलापल्ले, माजी नगरसेवक राजकुमार भालेराव, फय्याज शेख, बबिता भोसले, रेखा कानमंदे, सय्यद जानी, वसंत पाटील, सर्जेराव भांगे, इब्राहिम पटेल, शशिकांत बनसोडे, शिवकुमार कांबळे, सतिश कांबळे, संघशक्ती बलांडे, कल्याण कपाळे,पिंटु कांबळे, एम.एस. भांगे, पप्पु गायकवाड, रामेश्वर शिंदे आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना ना.संजय बनसोडे यांनी, दलितवस्तीसाठी कोट्यावधी रुपयाचा निधी शासन खर्च करते त्याचा उपयोग माझ्या सर्व समाजबांधवांना व्हावा यासाठी संबंधित लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा. आपण सर्वजन जनतेचे सेवक असुन जनतेची प्रामाणिक सेवा करणे हे आपले कर्तव्य आहे. शासनाच्या संजय गांधी निराधार योजनेचा लाभ गोरगरिबांना मिळवुन द्यावा. आपल्या भागातील नागरीकांचे जीवनमान उंचावण्यासाठी भरघोष निधी उपलब्ध करुन देणार आहे.
४० वर्षापासुन वास्तव्यास असलेल्या गायरान जागेवरील नागरिकांना कायम करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. शहराबरोबरच ग्रामीण भागातही सर्व समाजाला न्याय दिला आहे. मतदार संघातील नागरीकांच्या मूलभूत गरजा पुर्ण केल्या असून या भागातील तरुणांच्या हाताला काम मिळावे त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी म्हणून एम. आय.डी. सी मंजूर केली आहे लवकरच त्याचेही काम पूर्ण होईल असे ना.बनसोडे यांनी सांगितले. यावेळी महेश पाटोदेकर,राजकुमार चव्हाण, सतिश वाघमारे,निवृत्ती भाटकुळे, शिवमुर्ती उमरगेकर, शरद मादळे, बाबासाहेब सुर्यवंशी, जॅकी सावंत,उमर सय्यद, खाजा पटेल, संदेश गोदाम, दयानंद सुर्यवंशी, महादेव सुर्यवंशी, हणमंत पिंपळे, शिवा पकोळे, माधव कांबळे, विनोद कांबळे, आदी उपस्थित होते. प्रास्ताविक मुख्याधिकारी क्यातमवार यांनी केले. सुत्रसंचलन प्रदीप जोंधळे व खंडु सोनकांबळे यांनी केले. या कार्यक्रमास शहरातील समाजबांधव व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author