मानवी तस्करीबद्दल जनजागृतीसाठी मातृभूमीचे वाॅक फाॅर फ्रिडम
उदगीर (एल.पी.उगीले) : मानवी तस्करीबद्दल जनजागृती करण्यासाठी मातृभूमी महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने वॉक फॉर फ्रीडमचे आयोजन करण्यात आले होते. आधुनिक काळातील गुलामगिरीच्या विरोधात जगातील अनेक देशांमध्ये वॉक फॉर फ्रीडमचे आयोजन करण्यात येते. मानवी तस्करी या आतिशय गंभीर विषयाकडे सर्वसामान्य नागरीकांनी गांभिर्याने पहाने महत्वाचे असल्याने मानवी तस्करीबद्दल जनजागृती करण्यासाठी मातृभूमी महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने वाॅक फाॅर फ्रिडम चे आयोजन करण्यात आले होते. वाॅक फाॅर फ्रिडम पदययात्रा मातृभूमी महाविद्यालय , छत्रपती शिवाजी महराज चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक या दरम्यान वाॅकचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मातृभूमी महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे स्वंयसेवक सहभागी झाले होते. यावेळी मातृभूमी प्रतिष्ठान शिक्षण प्रसारक मंडळाच्या सचिव उषा कुलकर्णी ,प्र. प्राचार्य डाॅ मनोज गुरुडे, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रमाधिकारी प्रा. बिभीषण मद्देवाड मारुती जायभाये, पोलीस हावलदार पुट्टेवाड, कॉन्स्टेबल तेलमटे विनायक चव्हाण, महेश मुसळे, अक्षय मंडलापुरे, संतोष जोशी, प्रा रणजित मोरे, प्रा उस्ताद सय्यद, प्रा चटलावार राजेश, प्रा रेखा रणक्षेत्रे, प्रा रुपाली कुलकर्णी, प्रा संगम कुलकर्णी, प्रा जाई शर्मा आदी उपस्थित होते.