मोघा येथे अखंड हरिनाम सप्ताह सुरू
उदगीर (एल.पी.उगीले) : गेल्या ५६ वर्षांपासून धोंडोपंत दादासाहेब व गुंडा महाराज चांदेगावकर यांच्या कृपाशीर्वादाने सुरू असलेल्या मोघा येथील अखंड हरिनाम सप्ताहास बुधवार पासून सुरूवात झाली आहे. या सप्ताहाची सांगता २९ रोजी ह.भ.प.निवृत्ती महाराज रावीकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने होणार आहे.
ह.भ.प.भागवत महाराज चांदेगावकर यांनी सकाळी देवदेवताचे पुजन करून व पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकारामांच्या गजरात या सप्ताहास सुरूवात करण्यात आली.या सप्ताहात आत्माराम महाराज कुमठेकर,गुरूराज महाराज देगलुरकर, गोरखगीर महाराज धोंडीहिप्परगा, पुंडलिक महाराज देहूकर,एकनाथ महाराज हांडे पंढरपूर,श्रीहरी नामदास महाराज पंढरपूर यांची कीर्तने होणार आहेत.
३० जानेवारी रोजी लक्ष्मण शक्तीचा कार्यक्रम व श्रीमद भागवत कथा ३१जानेवारी रोजी भागवताचार्य निवृत्ती महाराज जांभळवाडीकर यांची होणार आहे.महाप्रसादाचा कार्यक्रम अमृत मेहकरे,कृष्णकांत उद्देश व कोंडलराव पाटील व हंसराज पाटील यांच्याकडून होणार आहे.विविध धार्मिक कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन मोघा ग्रामस्थांनी केले आहे.