दिल्ली येथे होणाऱ्या परेडसाठी वैभवी शेंडगे हिची निवड

0
दिल्ली येथे होणाऱ्या परेडसाठी वैभवी शेंडगे हिची निवड

दिल्ली येथे होणाऱ्या परेडसाठी वैभवी शेंडगे हिची निवड

मुरुम (एल.पी.उगीले) : श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय उमरगा येथील एनसीसी विभागातील कॅडेट वैभवी गोपाळ शेंडगे हिची दिल्ली येथे होणाऱ्या 26 जानेवारी 2025 रोजीच्या प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या RDC संचलन परेडसाठी पंतप्रधान रॅलीसाठी ड्रिल मधुन तिची महाराष्ट्राच्या मुलीच्या संघात निवड झाली आहे .प्रत्येक वर्षी होणाऱ्या या संचलनासाठी देशातुन सर्व राज्य व केंद्रशासित प्रदेशातुन एनसीसी कॅडेटस ड्रिल परेड इतर सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होतात . या साठी अनेक कठिन चाचण्या, परीक्षा पूर्ण करून ते कॅडेटस इथपर्यंत पोहचतात. प्रत्येक कॅडेटसचे एनसीसी मध्ये प्रवेश घेतल्या नंतर सर्वात मोठे उदिष्ठ , स्वप्न याच शिबीराचे असते. रात्र -दिवस एक करून हे कॅडेटस याची तयारी करत असतात.हे शिबीर कॅडेटसचे भवितव्य ठरवणारे असते. मौजे कोरेगाववाडी ता.उमरगा, जी. धाराशिव येथील छोट्याशा खेडगावातुन कठिन अशा परिस्थितीताला सामोरे जाऊन एका गरीब शेतकऱ्याची मुलीने स्वतःच्या जिद्द ,आत्मविश्वास , कठोर परिश्रम घेऊन हे यश वैभवी शेंडगे या मुलीने पूर्ण करून दाखविले आहे. तिचे कौतुक संपुर्ण धाराशिव जिल्हा,उमरगा तालुक्यातुन होत आहे . वैभवीला 53 महाराष्ट्र एनसीसी बरालिएन लातूरचे कमांडिंग अधिकारी कर्नल वाय बी सिंग त्यांच्यासह सर्व सैन्यदलातील संघ व कॅप्टन डॉ ज्ञानेश्वर चिट्टमपल्ले यांनी मार्गदर्शन केले . या यशा बदल भारत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अमोल भैया मोरे, उपाध्यक्ष अश्लेषभैया मोरे , संस्थेचे संचालक मंडळातील सदस्यानी तिचे कौतुक व अभिनंदन केले . तसेच शिबीरात सहभागी झाल्या बदल प्राचार्य डॉ संजय अस्वले,उप्राचार्य डॉ. विलास इंगळे , डॉ पदमाकर पिटले , प्रा गुंडाबापु मोरे , शैलेश महामुनी , श्री नितीन कोराळे , राजकुमार सोनवणे, सर्व प्राध्यापक , प्राध्यापिका कॅडेटस , विद्यार्थी , कर्मचारी यांच्या वतीने यशिस्वेतेसाठी शुभेच्छा दिल्या.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *