राष्ट्रीय सेवा योजना शिबिरे ही तरुणांच्या व्यक्तिमत्त्वाची साधने – प्राचार्य अशोक सपाटे
मुरुम (एल.पी.उगीले) : भारत हा जगात तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो. तरुणांना सक्षम व समृद्ध बनविण्यासाठी चांगल्या विचारांची आवश्यकता असते. असे चांगले विचार आणि उपक्रमशीलता ही अशा राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिरांमधून मिळते. अशी राष्ट्रीय सेवा योजनेची शिबिरे ही तरुणांच्या व्यक्तिमत्त्वाची साधने असल्याचे प्रतिपादन प्राचार्य डॉ. अशोक सपाटे यांनी केले. नाईक नगर, ता. उमरगा येथे श्री माधवराव पाटील महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आयोजित वार्षिक विशेष शिबिर समोरापप्रसंगी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. प्रारंभी महात्मा गांधी व संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी नाईकनगर (सुं) चे मुख्याध्यापक गोविंद चव्हाण, उपप्राचार्य डॉ. चंद्रकांत बिराजदार, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. प्रतापसिंग राजपूत, माधवराव पाटील कॉलेज ऑफ फार्मसीचे समन्वयक प्रा. डॉ. रवींद्र आळंगे, प्रा. अशोक बावगे आदिंची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलताना अशोक सपाटे म्हणाले की, आज युवकांसमोर विविध आव्हाने आहेत. यामध्ये वाढती व्यसनाधीनता, अंधश्रद्धा, बदलती मानसिकता, मोबाईलचा अतिरेकी वापर, गुन्हेगारीकरण, वाढते प्रदूषण आदि. या आव्हान व समस्यांवर तरुणांनी एकत्रित येऊन काम केले पाहिजे. सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगात इथला तरुण संगणक क्षेत्रात साक्षर होऊन इतरांनाही त्यांनी साक्षर केले पाहिजे. यावेळी डॉ. चंद्रकांत बिराजदार यांनी मनोगत व्यक्त केले. सदर शिबिर यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. प्रतापसिंग राजपूत, प्रा. अशोक बावगे, डॉ. शिला स्वामी, डॉ. प्रकाश कुलकर्णी , डॉ. विलास खडके, डॉ. राम बजगिरे, डॉ. नागोराव बोईनवाड, डॉ. नरसिंग कदम, डॉ. आप्पासाहेब सूर्यवंशी, डॉ. विनायक रासुरे, प्रा. गोपाळ कुलकर्णी, प्रा. अजिंक्य राठोड, दिलीप घाटे, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक अभिषेक पुजारी, श्रीकांत शुक्ला, श्रावण कोकणे, चंद्रकांत पुजारी आदिंनी पुढाकार घेतला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रा. अशोक बावगे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. सुभाष हुलपल्ले तर आभार डॉ. प्रतापसिंग राजपूत यांनी मानले. बहुसंख्येने विद्यार्थी-विद्यार्थीनी, ग्रामस्थ उपस्थित होते.