11 लाख 36 हजार रुपयांचा प्रतिबंधित गुटखा, सुगंधित तंबाखू, ऐवज जप्त
लातूर (एल.पी.उगीले) : लातूर जिल्ह्यात प्रतिबंधित गुटखा आणि सुगंधित तंबाखूचे प्रमाण वाढल्यामुळे पोलीस प्रशासनाला सतर्क राहण्याच्या आधी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिले होते तसेच अवैध धंदे बंद झाले पाहिजेत, अशा पद्धतीने कठोर सूचनाही दिल्या होत्या. त्या सूचनांचे तंतोतंत पालन करत लातूर पोलिसांनी महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा सुगंधित तंबाखू विक्रेत्यावर धाडी टाकून सुरू केले आहे. तसेच गुटखा व सुगंधित तंबाखूची अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई करून जप्त केले जात आहेत. अशाच पद्धतीने लातूर येथील गांधी चौक पोलिसांनी कारवाई करत 11 लाख 36 हजार रुपये किमतीचा ऐवज जप्त केला आहे.
या बाबत थोडक्यात हकीकत अशी की,पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे,यांचे मार्गदर्शनात संपूर्ण लातूर जिल्ह्यात अवैध धंद्यावर कठोर कारवाईची मोहीम राबवित येत आहे.
दिनांक 24/01/2025 रोजी पोलीस ठाणे गांधी चौक च्या पोलीस पथकास महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेले अन्नपदार्थ तंबाखूजन्य पदार्थाची अवैध विक्री व्यवसाय करण्यासाठी वाहतूक करीत आहे. अशी खात्रीशीर माहिती मिळाली. सदर माहितीवरून पोलीस ठाणे गांधी चौक च्या पथकाने दिनांक 24/01/2025 रोजी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास रिंगरोड वरून महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र राज्यामध्ये विक्रीसाठी प्रतिबंधित केलेला 8 लाख 36 हजार 400 रूपयाचा विमल V1 नावाचा गुटखा,सुगंधित तंबाखू , 3 लाख रुपयाचे एक पिकअप वाहन असा एकूण 11 लाख 36 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आले आहे.
प्रतिबंधित गुटखा, सुगंधित तंबाखूची अवैधरित्या वाहतूक करीत असताना मिळून आलेले इसम नामे सुनील भारतलाल राठी, (वय 34 वर्ष, राहणार सुपारी हनुमान जवळ, मोती नगर, लातूर),ज्ञानेश्वर भास्कर रावते, (वय 30 वर्ष, राहणार करजगाव तालुका औसा जिल्हा लातूर).यांचे विरुद्ध पोलीस अमलदार दत्तात्रय शिंदे यांनी दिलेल्या फिर्याद वरून पोलीस ठाणे गांधीचौक येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून नमूद आरोपींना न्यायलासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपींना 2 दिवसाची पोलीस कस्टडी सुनावली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक साहेबराव नरवाडे हे करीत आहेत.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी (लातूर शहर) रणजीत सावंत यांचे मार्गदर्शनात, पोलीस ठाणे गांधीचौक चे पोलीस निरीक्षक साहेबराव नरवाडे यांचे नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक पंडित भंडारे, पोलीस अमलदार दयानंद आरदवाड, दत्तात्रय शिंदे यांनी केली आहे.