लोकशाहीच्या यशस्वीतेसाठी मतदारांची भूमिका महत्त्वाची – प्राचार्य डॉ. संजय अस्वले
मुरुम (सुधीर पंचगल्ले) : लोकशाही व्यवस्थेमध्ये लोकांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधींची भूमिका महत्त्वाची असते आणि प्रतिनिधी निवडून देण्याची महत्त्वाची जबाबदारी मतदारांवर असल्याने ज्या तरुणांची वयाची आठरा वर्ष पूर्ण झाली असतील, त्यांनी आपले नाव मतदार यादीत नोंदवावीत आणि मतदान प्रक्रियेत सहभाग घ्यावा. त्यामुळेच लोकशाही यशस्वी होऊ शकेल, असे मत प्राचार्य डॉ. संजय अस्वले यांनी व्यक्त केले. राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
येथील श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयात तहसील कार्यालय उमरगा आणि महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभागाच्या वतीने 25 जानेवारी राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांच्या पारितोषिक वितरण कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी नायब तहसीलदार प्रवीण कावरे यांनी राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्यामागची भूमिका विद्यार्थ्यांना सांगितली. तहसील कार्यालयातील दत्ता सूर्यवंशी, संदीप सरपे, यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मतदारांसाठीच्या प्रतिज्ञाचे सामूहिक वाचन करण्यात आले.
श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय राज्यशास्त्र विभाग, एनसीसी विभागाच्या वतीने निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा आणि रांगोळी स्पर्धा घेण्यात आली. निबंध स्पर्धेत सोनाली दुधभाते यांनी प्रथम, गौरी मुळे यांनी द्वितीय, समीक्षा सुरवसे यांना तृतीय, तर श्रुती पांचाळ यांना उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त झाले. वक्तृत्व स्पर्धेत स्वरुपा जगदाळे यांनी प्रथम, झरे वैष्णवी यांनी द्वितीय, गंगोत्री चिंचोले यांनी तृतीय, तर चव्हाण प्रज्वल यांनी उत्तेजनार्थ पारितोषिक मिळविले. रांगोळी स्पर्धेमध्ये धने अनिशा यांना प्रथम, जगदाळे स्वरुपा यांना द्वितीय, शिंदे प्रियंका यांना तृतीय तर नेहा गिरी यांना उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले. पारितोषिक प्राप्त सर्व विद्यार्थ्यांना प्राचार्य डॉ . संजय अस्वले आणि नायब तहसिलदार मा. प्रवीण कावरे यांच्या हस्ते प्रमाणपत्र आणि बक्षीस वितरण करण्यात आले. याप्रसंगी प्रा. सुनील बिराजदार यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. या कार्यक्रमाला उपप्राचार्य डॉ. विलास इंगळे, डॉ. पद्माकर पिटले, राज्यशास्त्र विभाग प्रमुख सुनील बिराजदार, डॉ. ढोबळे डी. बी., कॅप्टन डॉ. ज्ञानेश्वर चित्तमपल्ले डॉ. अनिल देशमुख, प्रा. श्रीकांत कुंभार, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. डी . बी. ढोबळे यांनी तर उपस्थिताचे आभार डॉ. अनिल देशमुख यांनी मानले.