माधवराव पाटील महाविद्यालयात राष्ट्रीय मतदान दिन साजरा
मुरूम (एल.पी.उगीले) : श्री माधवराव पाटील महाविद्यालयाच्या राज्यशास्त्र पदवी-पदव्युत्तर विभाग व संशोधन केंद्र व माधवराव पाटील कॉलेज ऑफ फार्मसी च्या संयुक्त विद्यमाने आयोजित मतदान जनजागृती अभियान अंतर्गत राष्ट्रीय मतदान दिन विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. यावेळी उपप्राचार्य डॉ. चंद्रकांत बिराजदार यांच्या हस्ते मतदान जनजागृती अभियानाच्या पत्रक व भिंतीपत्रकाचे प्रकाशन करण्यात आले. लोकशाही आणि मतदानाचा मूलभूत हक्क या विषयावर प्रा. डॉ. महेश मोटे यांनी विस्ताराने मार्गदर्शन केले. यावेळी चंद्रकांत बिराजदार म्हणाले की, युवकांनी मतदानाचा अधिकार हे घटनात्मक व मूलभूत अधिकार असल्याने या अमूल्य अधिकाराचा वापर अतिशय जबाबदारीने पार पाडला पाहिजे. यावेळी माधवराव पाटील कॉलेज ऑफ फार्मसीचे समन्वयक प्रा. डॉ. रवींद्र आळंगे, महाराष्ट्र पत्रकार संघाचे मराठवाडा उपाध्यक्ष प्रा. डॉ. सुधीर पंचगल्ले, डॉ. रवींद्र गायकवाड, प्रा. दयानंद बिराजदार, डॉ. अविनाश मुळे, डॉ. विलास खडके, डॉ. शिला स्वामी, प्रा. नाना बेंडकाळे, प्रा. प्रियंका काजळे, प्रा. राजनंदिनी लिमये, प्रा. सदाफलमास मुजावर आदींची उपस्थिती होती. याप्रसंगी सामुदायिक मतदान प्रतिज्ञेचे वाचन कुमारी प्रियंका मुंडासे यांनी केले. हिराबाई सोलापूरे यांनी मतदान जनजागृती संदर्भात घोषणाबाजी करून घोषवाक्य उद्गारून वातावरण निर्मिती केली. नागरिकांनी मतदान का करावे ? या पत्रकाचे लेखन कुमारी दिव्या सूर्यवंशी यांनी केले. भारतीय लोकशाही आदर्श हे भिंतीपत्रक कुमारी प्रीती मुंडासे यांनी बनवले. आरती कांबळे, किशोर कारभारी, सलोनी वाघे, नबीलाल जमादार, दिनेश गडवे, प्रभाकर महिंद्रकर आदींनी पुढाकार घेतला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सायबण्णा घोडके घोडके यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. नागनाथ बनसोडे तर आभार प्रा. पायल अंबर यांनी मानले. यावेळी महाविद्यालयातील विविध शाखेचे विद्यार्थी-विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होत्या.