राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त यशवंत विद्यालयात विविध स्पर्धेचे आयोजन

0
राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त यशवंत विद्यालयात विविध स्पर्धेचे आयोजन

राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त यशवंत विद्यालयात विविध स्पर्धेचे आयोजन

चित्रकला स्पर्धा,रांगोळी स्पर्धा व निबंध स्पर्धेतून केली मतदार जनजागृती

अहमदपूर (गोविंद काळे) : अहमदपूर तहसिल कार्यालयाच्या वतीने यशवंत विद्यालय अहमदपूर येथे राष्ट्रीय मतदार दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.25 जानेवारी 1950 रोजी निवडणूक आयोगाची स्थापना झाली म्हणून हा दिवस राष्ट्रीय मतदार दिन म्हणून साजरा केला जातो. या औचित्याने प्रत्येक तहसील कार्यालयात मतदारांना मतदानाबाबत जागरूक करण्यासाठी निवडणूक आयोगा मार्फत प्रतिवर्षी 18 वर्षांच्या नव तरुण मतदारांना ओळखपत्रे देऊन मतदान करण्यासाठी प्रोत्साहित केले जाते.
मतदान करणे हा प्रत्येक जबाबदार नागरिकाचा हक्क आणि कर्तव्य आहे. देशाचे उज्ज्वल भविष्य घडण्यासाठी तरुणांनी मतदानाबाबत जागरुक असणे गरजेचे आहे असे ऑनलाइन मत तहसिलदार उज्वला पांगरकर यांनी मांडले.
राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त निबंध स्पर्धेत प्रथम कु.अनघा ब्रह्मानंद मुर्के,द्वितीय कु.प्रतीक्षा गोविंद चावरे,तृतीय अद्वैत अंबरिश साताळकर चित्रकला स्पर्धेत प्रथम कुमारी स्नेहा दिगांबर बोईनवाड, द्वितीय प्रियदर्शिनी राघवेंद्र पासमेल,तृतीय साक्षी महेश पाटील हिने क्रमांक पटकाविला आहे. तर रांगोळी स्पर्धेत प्रथम साक्षी नारायण जायभाये, द्वितीय अक्षता उत्तम कांबळे,तृतीय स्नेहा दिगंबर बोईनवाड हिने पारितोषिक पटकावले आहे.
वरील गुणवंत विद्यार्थ्यांना 26 जानेवारी रोजी तहसील कार्यालय अहमदपूर येथे प्रशस्तीपत्र व बक्षीस देऊन गौरवीत करण्यात येणार आहे.
सदरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कलाध्यापक महादेव खळुरे परीश्रम घेतले.
सदरील स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थ्यांचे उपविभागीय अधिकारी मंजुषा लटपटे तहसीलदार उज्वला पांगरकर, नायब तहसीलदार अनर्थे एन.टी. नामदेव अर्जुने यांच्यासह
टागोर शिक्षण समितीचे अध्यक्ष डॉ.अशोक सांगवीकर,सचिव शिक्षण महर्षी डी.बी.लोहारे गुरुजी,सह सचिव डॉ.सुनिता चवळे,मुख्याध्यापक गजानन शिंदे,उपमुख्याध्यापक माधव वाघमारे,पर्यवेक्षक रामलिंग तत्तापुरे,शिवाजी सूर्यवंशी सांस्कृतिक प्रमुख राजकुमार पाटील,डॉ.शरद कारकनाळे,शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आदिनी अभिनंदन केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *