महात्मा जोतिराव फुले हे शेतकऱ्यांचे कैवारी होते – डी एस वाघमारे

0
महात्मा जोतिराव फुले हे शेतकऱ्यांचे कैवारी होते - डी एस वाघमारे

महात्मा जोतिराव फुले हे शेतकऱ्यांचे कैवारी होते - डी एस वाघमारे

अहमदपूर (गोविंद काळे) : पुण्यामध्ये हंटर कमिशन आल्यानंतर शेतकऱ्यांच्या वेशामध्ये जाऊन हंटर कमिशन समोर शेतकऱ्यांच्या प्रश्नाची बाजू समर्थपणे मांडणारे शेतकऱ्यांचे कैवारी महात्मा जोतिराव फुले हे भारताचे पहिले समाजसुधारक होते असे प्रखर विचार डी एस वाघमारे यांनी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीदिनी काढले. छत्रपती शाहू राजे योगा ग्रुप च्या वतीने आज दिनांक 11 एप्रिल 2025 रोजी अहमदपूर येथील योगा मैदानावर सकाळी 7:00 वाजता महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती साजरी करण्यात आली.
योगा ग्रुपचे सन्माननीय सदस्य श्री विनोद महालिंगे यांच्या शुभहस्ते फोटोस पुष्पहार अर्पण करून सर्वांनी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमेस अभिवादन केले.
पुढे डी एस वाघमारे यांनी असे सांगितले की महात्मा ज्योतिराव फुले यांचा जन्म 11 एप्रिल 1827 रोजी पुण्यामध्ये झाला आहे
जन्मानंतर केवळ सातच वर्षांनी त्यांच्या आईचा मृत्यू झालेला आहे
ते केवळ 12 वर्षाचे असताना त्यांचा विवाह माता सावित्रीशी झालेला आहे त्यावेळेस माता सावित्रीचे वय केवळ 9 वर्षाचे होते
त्यांनी बघितले की समाजामध्ये अनेक अनिष्ट चालीरीती रुढी परंपरा आहेत. गरीब शूद्र आणि महिलांना शिक्षणाचा अधिकार नाही. शिक्षणाशिवाय माणसाची प्रगती होणे शक्य नाही म्हणून त्यांनी 3 ऑगस्ट 1848 रोजी पुण्यामध्ये पहिली मुलीसाठी शाळा काढली. अनेक अडचणीला तोंड देत देत त्यांनी पुणे जिल्ह्यामध्ये एका वर्षामध्ये 20 शाळा काढल्या एवढे मोठे प्रचंड शैक्षणिक कार्य महात्मा ज्योतिराव फुले यांनी केले आहे
1791 मध्ये त्यांच्यावर थॉमस पेन या लेखकांच्या राइट्स ऑफ म्यान या पुस्तकांचा प्रचंड प्रभाव पडला आणि त्याच्यापासून त्यांना गोरगरिबांच्या उद्धाराची प्रेरणा मिळाली आणि म्हणून त्यांनी 24 सप्टेंबर 1873 रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना केली आणि बहुजन उद्धाराचे कार्य त्यांनी जोमाने चालू केले आणि या कामात त्यांना सावित्रीबाई फुले यांचे मोठे सहकार्य मिळत असे.
त्या कामात कोल्हापूर संस्थांचे राजे छत्रपती शाहू महाराज यांचेही मोठे सहकार्य मिळाले आणि त्या जोरावर त्यांनी ही चळवळ मोठ्या जमाने चालू ठेवली. 11 मे 1888 रोजी मुंबईतील एका प्रचंड सभेत त्यांच्या असामान्य कार्याबद्दल त्यांना महात्मा ही पदवी बहाल करण्यात आली. पुण्यात आलेल्या हंटर कमिशन समोर शेतकऱ्याबाबतच्या अनेक प्रश्नावर चर्चा करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचे कार्य महात्मा ज्योतिराव फुले यांनी केले आहे
महात्मा ज्योतिराव फुले हे त्यावेळेसचे अत्यंत सदन व्यक्ती होते. ते बांधकामातले तज्ञ सुद्धा होते. त्यांनी बडोद्याचे महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या महालाचे आणि मुंबईला जोडणाऱ्या पहिल्या बोगद्याचे काम सुद्धा त्यांच्या बांधकाम कंपनीने केले आहे. ते काही काळ पुण्याचे महापौर सुद्धा होते. त्यांनी आयुष्यभर समाज उद्धाराचे कार्य केले.
समाजकंटकांनी महात्मा फुले यांना मारण्यासाठी सशस्त्र मारेकरी पाठवले पण महात्मा फुले च्या प्रेमळ स्वभावापुढे मारेकऱ्यांनी शस्त्र फेकून दिले आणि कायमचे त्यांचे अनुयायी झाले अशा महान समाज सुधारकांची जयंती आपण आज साजरी करत आहोत असेही त्यांनी सांगितले.
शेवटी छत्रपती शाहूराजे योगा ग्रुप चे अध्यक्ष श्री एन डी राठोड यांनी शेतकऱ्यांच्या पाणी धोरणावर माहिती दिली. जयंती महोत्सवाचे सूत्रसंचालन प्राध्यापक गौतम वाघमारे यांनी केले तर आभार बालाजी दुकाने यांनी मानले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!