हिंदू खाटीक समाज उदगीर संघटनेच्या वतीने व्यंकट साबणे यांचा सत्कार

0
हिंदू खाटीक समाज उदगीर संघटनेच्या वतीने व्यंकट साबणे यांचा सत्कार

उदगीर(एल पी उगिले)- हिंदू खाटीक समाजाचे जेष्ठ कार्यकर्ते हे गेल्या अनेक वर्षापासून शिवसेनेत कार्यरत असून त्यांनी उदगीरमध्ये शिवसेना पक्ष वाढवण्यासाठी पुढाकार घेतला. त्यांच्या कार्याची दखल घेऊन उबाठा पक्षाच्या वतीने तालुका समन्वयक पदी निवड करण्यात आली आहे. यामुळे त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत.
साबणे कॉम्प्ले्नस येथे हिंदू खाटीक समाज उदगीरच्या वतीने अध्यक्ष ॲड. मंगेश साबणे व महादेव घोणे यांनी व्यंकट साबणे यांचा शाल, पुष्पहाराने सत्कार केला. यावेळी अध्यक्ष ॲड.मंगेश साबणे यांनी शुभेच्छा देताना म्हणाले की, यांच्या निवडीमुळे हिंदू खाटीक समाजाचे सर्वत्र नौवलौकिक होत आहे. यामुळे ते असेच प्रगती करत राहोत. असे मत व्यकत करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. यानंतर अ.भा.खा.स. जिल्हाध्यक्ष महादेव घोणे यांनी बोलताना म्हणाले की, उदगीरला शिवसेनेची ओळख साबणे परीवराकडून झाली. व्यंकट साबणे हे कोणत्याही पदाची किंवा लोभाची अपेक्षा न करता पक्षासाठी निस्वार्थपणे काम करत राहिले. पक्षातील चढउतार होत असतानाही त्यांनी पक्षावर निष्ठा कायम ठेवली व हीच हिंदू खाटीक समाजाच्या इमानदारीची पावती आहे.
मूळ शिवसेनेकडून हिंदू खाटीक समाजावर विश्वास ठेऊन विविध जबाबदाऱ्या मिळत गेल्या व साबणे परीवाराने निष्ठेने पार पाडले. याची दखल घेणे म्हणजे व्यंकट साबणे यांची तालुका समन्वयकपदी नियुक्ती करणे यामुळे त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा असे मत व्यक्त केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!