तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत स्वयं शासन दिन उत्साहाने साजरा…..

0
तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत स्वयं शासन दिन उत्साहाने साजरा…..

उदगीर (एल पी उगिले) तालुक्यातील मौजे तिवटग्याळ येथील येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत इयत्ता पाचवी च्या विद्यार्थ्यांनी स्वंयशासन दिन उत्साहाने साजरा केला. प्रथम शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे यांनी विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक ते शिक्षक या पदाविषयी लिखीत स्वरुपात त्यांचे कार्य लिहून देण्यात आले. या प्रमाणे कु.स्नेहा गणेश तोमर पाटील – मुख्याध्यापक, कु. गंगासागर छगनसिंग बिरादार शिक्षिका, प्रांजली शंकर कांबळे – शिक्षिका या विद्यार्थ्यांना त्यांच्या पदा विषयी सविस्तर लेखी स्वरूपात लिहून देण्यात आले. या प्रमाणे विद्यार्थ्यांनी दिलेल्या तासीका प्रमाणे विद्यार्थ्यांना आनंदी, उत्साहाने अध्यापन केले. विद्यार्थ्यांना खूप आनंद तसेच मज्जा आली, असे शाळेतील विद्यार्थ्यांनी बोलून दाखविले. तद्नंतर इयत्ता पाचवी च्या विद्यार्थ्यांनी स्वंयशासन दिन निमित्य शाळेस महाराणा प्रताप यांची प्रतिमा भेट दिली. शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे यांनी विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर स्वंयशासन दिन साजरा केल्या बद्दल अभिनंदन केले. व पुढील शैक्षणिक वर्षासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थीनीं मुख्याध्यापक कु. गंगासागर छगनसिंग बिरादार व आभार प्रदर्शन स्नेहा गणेश तोमर पाटील यांनी मानले.या वेळी शाळेतील सर्व विद्यार्थी, मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे, शालेय पोषण आहार मदतनीस वर्षा श्रीमंगले, गीताताई कच्छवे, अंगणवाडी कार्यकर्ती पूजा बिरादार व मदतनीस भागाबाई बिरादार आदी जण उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!